पुणे

अक्वानकडूनही राज्याला दिलासा नाही

CD

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे, ता. १८ : बंगालच्या उपसागरातील अक्वान चक्रीवादळ येत्या २० नोव्हेंबरला आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दरम्यान जमिनीवर प्रवेश करण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. २० दिवसांत तयार झालेल्या सलग तिसऱ्या चक्रीवादळाचाही लाभ महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता नसून, त्यामागे दोन जास्त दाबाची क्षेत्रे कारणीभूत असल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

एप्रिल, मे हा मॉन्सूनपूर्व आणि ऑक्टोबर ते डिसेंबर हा मॉन्सूनोत्तर हंगाम उत्तर हिंदी महासागरात चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी अनुकूल असतो. यंदा मॉन्सूनपूर्व हंगामात चक्रीवादळांची निर्मिती झाली नाही. मात्र, मॉन्सूनोत्तर हंगामात फक्त २० दिवसांत ‘अर्णव’, ‘मुरासू’ आणि ‘अक्वान’ या तीन चक्रीवादळांची एकापाठोपाठ एक निर्मिती झाली. यंदाच्या मॉन्सून हंगामात राज्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे या चक्रीवादळांमुळे राज्यातील काही भागांना पाऊस मिळू शकेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली होती. मात्र, राज्यावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तिसऱ्या चक्रीवादळापासूनही पावसाची शक्यता नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

पावसाची अपेक्षा नाही
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांनी सकाळशी बोलताना सांगितले, ‘‘सध्या अरबी समुद्रावर वातावरणात पाच किलोमीटर उंचीवर जास्त दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याभोवती फिरणारे तीव्र वारे महाराष्ट्रावर पश्चिम, वायव्येकडून येत आहेत. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील अक्वान चक्रीवादळाच्या पूर्वेलाही त्याच उंचीवर दुसरे जास्त दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन जास्त दाबाच्या क्षेत्रांमधील चिंचोळ्या पट्ट्यामधून वादळाचा उत्तर, वायव्य दिशेने प्रवास अपेक्षित आहे. महाराष्ट्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे चक्रीवादळाकडून पावसाची अपेक्षा ठेवता येणार नाही.’’

पाठोपाठ तीन चक्रीवादळांची निर्मिती
‘‘खरेतर एल निनोच्या काळात हिंदी महासागरातील चक्रीवादळांची निर्मिती मंदावत असते. यंदा मात्र मॉन्सूनोत्तर हंगामात मॅडन- ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) हे ढगांचे क्षेत्र दीर्घकाळ हिंदी महासागरावर सक्रिय राहिल्याने पाठोपाठ तीन चक्रीवादळांची निर्मिती झाली. या चक्रीवादळांचा मार्ग तामिळनाडूकडे गेला असता, तर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्याला पावसाचा लाभ मिळाला असता. मात्र आधीच्या दोन चक्रीवादळांपाठोपाठ अक्वानही आंध्र प्रदेश, ओडिशाकडे सरकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे,’’ असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balasaheb Thackeray Photo: फोटो फाडल्याच्या आरोपांवर शायना एनसींकडून स्पष्टीकरण; एकनाथ शिंदेही बोलले...

Nagpur News : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी कान्होलीबारातील शिक्षकाला अटक; सायबर पोलिसांची कारवाई, तीन दिवसाची पोलिस कोठडी

Pune FDA Action : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड; नऊ दुकानांच्या तपासणीत सहा व्यावसायिकांवर प्रशासनाची कारवाई

Latest Marathi News Live Update : ओबीसी हॉस्टेल बांधण्यासाठी महसूल विभागाचा जागा देण्याचा निर्णय

MSC Bank : राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

SCROLL FOR NEXT