पुणे

पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद

CD

फोटो ः एरिना अहमद
रोहित देसाई चेहरा

एरिना अहमदला जेतेपदाचा मान
पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद

पुणे, ता. १० ः पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित माजी टेबल टेनिसपटू, बालुफ ऑटोमेशन प्लेअर्स करंडक पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अकरा वर्षांखालील मुलींच्या गटात बिगर मानांकन असलेल्या एरिना अहमदने विजेतेपदाला गवसणी घातली. ४० वर्षांवरील गटाचे जेतेपद दुसऱ्या मानांकित रोहित देसाईने संपादिले.
एरंडवणा येथील शारदा स्पोर्ट्‌स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत अकरा वर्षाखालील मुलींमध्ये अंतिम लढतीत बिगर मानांकित एरिना अहमदने दुसऱ्या मानांकित शगुन गणेशेचा चुरशीच्या सामन्यात ९-११, ११-५, १३-११, १६-११, १३-११ असा पराभव केला या लढतीत जोरदार खेळ करणाऱ्या शगुन गणेशेने पहिली गेम ११-९ अशी जिंकून जोरदार सुरवात केली परंतू एरिना अहमदने त्यानंतर चारही गेम ११-५, १३-११, १६-११, १३-११ अशा जिंकून जेतेपद मिळविले. त्याआधी उपांत्य फेरीत एरिना अहमदने अव्वल मानांकित शरण्या पटवर्धनचा ११-६, ११-७, ५-११, ९-११, ११-८ असे तर द्वितीय मानांकित शगुन गणेशेने तिसऱ्या मानांकित रुहानी भारद्वाजचा ११-२, ९-११, ४-११, ११-५, ११-३ असा पराभव केला होता.
४० वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित रोहित देसाईने अव्वल मानांकित सुयोग पाटीलचा चुरशीच्या लढतीत ९-११, ११-९, १०-१२, ११-७, ११-८ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. त्याआधी उपांत्य फेरीत सुयोग पाटीलने स्वानंद बेडेकरला ५-११, ११-५, ६-११, ११-७, ११-९ असे तर रोहित देसाईने मनोज फडकेला ११-५, ८-११, ११-६, ११-४ असे पराभूत केले होते. उपांत्यपूर्व फेरीत सुयोग पाटीलने संजय पटेलवर ११-७, ११-४, ११-६ असा, चौथ्या मानांकित स्वानंद बेडेकरने ओंकार जोगवर ११-६, ९-११, १२-१०, ११-६ असा तर मनोज फडकेने जोगेश जैनवर ११-८, ११-५, ११-७ असा तर रोहित देसाईने प्रदीप गुप्तावर ११-८, ११-६, ११-६ असा विजय मिळविला होता.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT