आरेवाडी हायस्कूल, आगाशिवनगर शाळा प्रथम
समूहगीत गायन स्पर्धेत बाजी; कऱ्हाड तालुक्यातील २६ शाळांचा सहभाग
मलकापूर, ता. २० : येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने घेतलेल्या समूहगीत गायन स्पर्धेत कऱ्हाड तालुक्यातील २६ शाळांतून ४१० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान गटात जिल्हा परिषद शाळा आगाशिवनगर नंबर एक व मोठ्या गटात आरेवाडी येथील (कै.) दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळवला.
सुधाकर शिंदे अध्यक्षस्थानी होते. शिक्षण विस्ताराधिकारी जमिला मुलाणी, संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, केंद्रप्रमुख गणेश जाधव, सचिन शिंदे, पंडित शिर्के, सुलोचना भिसे, सुजाता भावके, जयंती पटेल, अभिजित भोपते, शेखर शिर्के, एम. पी. फराळे उपस्थित होते.
मुलाणी म्हणाल्या, ‘‘अशा समूहगीत गायन स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. यातूनच कलावंत विद्यार्थी घडावेत, अशी अपेक्षा आहे.’’
सचिव थोरात म्हणाले, ‘‘३० वर्षे या स्पर्धा संस्थांच्या माध्यमातून अखंडितपणे आयोजित केल्या जातात, हीच खरी चांगल्या व निखळ स्पर्धेची पोच आहे.’’
यावेळी सुधाकर शिंदे यांचे भाषण झाले. स्पर्धा यशस्वितेसाठी शरद तांबवेकर यांनी विशेष प्रयत्न केले. जे. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कोमल पवार यांनी आभार मानले.
...
चौकट
..............
स्पर्धेचा निकाल असा ः
मोठा गट
* प्रथम - (कै.) दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूल, आरेवाडी
* द्वितीय - श्री संत तुकाराम हायस्कूल, कऱ्हाड, आत्माराम विद्यालय, ओगलेवाडी व केदार हायस्कूल, सुपने
*तृतीय - यशवंत हायस्कूल, कऱ्हाड व जिल्हा परिषद शाळा आगाशिवनगर नंबर एक
*उत्तेजनार्थ- रोटरी प्राथमिक विद्यालय मलकापूर व जिल्हा परिषद शाळा, नांदलापूर
लहान गट-
* प्रथम - जिल्हा परिषद शाळा, आगाशिवनगर नंबर एक
* द्वितीय - रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मलकापूर व जिल्हा परिषद केंद्र शाळा, मलकापूर
* तृतीय - जिल्हा परिषद शाळा, हौदमळा व जिल्हा परिषद शाळा, विश्रामनगर
* उत्तेजनार्थ - जिल्हा परिषद शाळा, लाहोटीनगर व जिल्हा परिषद शाळा, कोयनावसाहत
......
A01306
मलकापूर : मोठ्या गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारताना आरेवाडी येथील दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूलचे विद्यार्थी.
...................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.