पुणे - पुण्यातून रेल्वेप्रवास करायचा असेल, तर तुम्हाला कॅप्टन अर्जुनची परवानगी लागणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रवाशांची तपासणी करण्यासाठी मध्य रेल्वेच्यावतीने अर्जुन रोबोची नेमणूक करण्यात आली आहे. प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजणे आणि असामाजिक कृत्यांवर लक्ष ठेवणे असे काम हा रोबो करत आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने या रोबोचे संचालन केले जात आहे. मध्ये रेल्वेचे महासंचालक संजीव मित्तल म्हणाले,""रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्याचे काम हा रोबो करणार आहे. प्रवाशांशी असलेला कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष संपर्क यामुळे कमी होणार आहे. तसेच फलाटावर देखरेखीचे कामही कॅप्टन अर्जुन करणार आहे.'' पुणे स्थानकावर शुक्रवार (ता. 12) पासून कॅप्टन अर्जुन कार्यान्वित झाला आहे.
तपासणीला लागणारा वेळ लक्षात घेता प्रवाशांनी दोन तास आधी स्थानकावर येणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीत ज्यांच्या शरीराचे तापमान जास्त असेल त्यांना प्रवासासाठी प्रतिबंध करण्यात येणार आहे. तशी सूचना देण्याची व्यवस्था रोबोमध्ये करण्यात आली आहे.
रोबोची वैशिष्ट्ये
- मानवी शरीराचे तापमान मोजणार
- प्रवाशांमधील शारीरिक अंतरावर देखरेख
- थर्मल आणि व्हीजन कॅमेरा
- अंश सेल्सियसची अचूकता
- तत्काळ प्रतिक्रिया
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मोठ्या भागावरील तापमानाची नोंद घेण्यासाठी हा रोबो सक्षम आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या रोबोमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही द्विमितीय आकाराच्या तापमानाची नोंद आणि तात्काळ प्रतिक्रिया मिळते.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.