Armed Task Force to assist the government 
पुणे

Corona Virus : शासनाच्या मदतीसाठी गिर्यारोहकांचा टास्क फोर्स 

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'मुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी शासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मानसिक व शारिरीक दृष्ट्या कणखर असणाऱ्या गिर्यारोहकांची 'डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्स' तयार केली जात आहे. राज्याच्या विविध भागातून त्यांची नोंदणी सुरू आहे. 


अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने यासाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यानी  पत्र पाठविण्यात आले आहे. देशात महाराष्ट्रातील 'कोरोन' बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने केंद्र व राज्य शासनाकडून तयारी सुरू आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची आवश्यकता लागणार आहे. यासाठी 'एनसीसी', 'एनएसएस'च्या तरुणांची एक मोठी फळी तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

मुंबई, पुणे, नाशिक व इतर शहरात ट्रेकिंग करणारे अनेक गिरिमित्र आणि दुर्गमित्र आहेत. ते कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतात. 'कोरोना'च्या संकटात राज्यातील सर्व भागात गिर्यारोहकांचा सक्षमपणे वापर व्हावा यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. महासंघाच्या या 'डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्स'च्या माध्यमातून महासंघाने जिल्हापातळीवर प्रशिक्षित व अनुभवी स्वयंसेवकांची फळी सुसज्ज करण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी महासंघाकडे आपले नाव नोंदणी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdjWWXPtyBurFJKdjV0w6gVcaFev4-T38-43emmcWXTZHFAcg/viewform या लिंकवर नोंदणी करावी. शासकीय यंत्रणेच्या सहकार्याने निरनिराळ्या जबाबदारीची कामे स्वयंसेवकांना सोपविण्यात येतील. अधिक माहितीसाठी 9987990300  9822323147 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

"गिर्यारोहक कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असतात. कोरोना'चे संकट मोठे आहे. त्यामुळे अशा स्वयंसेवकांची शासनाला गरज लागणार आहे. त्यासाठी ही नावनोंदणी सुरू केली आहे."
- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT