Manorama Khedkar esakal
पुणे

शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत मनोरमा खेडकरांना नोटीस; दहा दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास होणार कारवाई

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशीम येथे नुकतीच बदली करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

मनोरमा खेडकर यांनी धडवली (ता. मुळशी) येथील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली.

पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा यांच्याविरुध्द पौड पोलिसांनी (Poud Police) गुन्हा दाखल केला होता.

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशीम येथे नुकतीच बदली करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबाबतच्या कागदपत्रांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेडकर यांच्यावर २६ हजार रुपयांचा थकीत दंड असल्याचे समोर आले. खेडकर यांनी खासगी मोटारीवर लाल दिवा लावल्याचे उघडकीस आल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.

दरम्यान, मनोरमा खेडकर यांनी धडवली (ता. मुळशी) येथील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. या प्रकरणी मनोरमा, त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्यासह सातजणांविरुद्ध पुणे ग्रामीणच्या पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनोरमा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘तुमचे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे.

या कृत्यामुळे कुटुंबीय आणि समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. शस्त्र परवान्यात दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना रद्द करण्यात का येऊ नये? याबाबत दहा दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, ’असे नोटिशीत म्हटले आहे. ही नोटीस खेडकर यांच्या बाणेर येथील नॅशनल सोसायटीतील बंगल्याच्या प्रवेशद्वारावर चिकटविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

AUSW vs PAKW: ७९-७ वरून २२१ धावा! पाकिस्तानने लावलेली वाट, पण ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी-एलना किंग राहिल्या ताठ! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

Sridhar Vembu's Zoho success story : कुणाकडून रुपयाचीही मदत न घेता, फक्त मित्र अन् कुटुंबाच्या पाठबळावर उभारली तब्बल 100000 कोटींची कंपनी!

Pune News : विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

Latest Marathi News Live Update : उमरखेड - ढाणकी रोडवर चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT