Chief of Defense Staff Sakal
पुणे

सैन्य दल प्रमुखांची ‘एनडीए’ला भेट

देशाच्या पायदळ, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी एकत्रितपणे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) नुकतीच भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशाच्या पायदळ, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी एकत्रितपणे खडकवासला (Khadakwasala) येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) (NDA) नुकतीच भेट दिली. त्यात त्यांनी `एनडीए’च्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी आधुनिक युद्धनितीच्या नव्या प्रवाहांवर भाष्य केले. तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक लष्करी नेतृत्वाचे प्राथमिक धडे आत्मसात करण्याचा सल्ला दिला. नौदल प्रमुखांसह हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदुरीया आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच तिन्ही दल प्रमुखांनी देशासाठी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या माजी एनडीए अधिकाऱ्यांच्या स्मारकाला भेट देत श्रद्धांजली वाहिली. या भेटीमुळे तिन्ही दलाच्या प्रशिक्षणार्थींमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होईल. तसेच आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च यश मिळवण्याची प्रेरणा त्यांना मिळेल, असा आशावाद ‘एनडीए’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अॅडमिरल करमबीर सिंग (नौदल प्रमुख), एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदुरीया (हवाईदल प्रमुख) आणि जनरल मनोज नरवणे (लष्करप्रमुख) हे तिघेही एनडीएचे पूर्वाश्रमीचे सहाध्यायी होते. ‘एनडीए’चेच विद्यार्थी तिन्ही दल प्रमुख असण्याचा हा १९९१ नंतरचा केवळ दुसराच प्रसंग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT