fraud sakal
पुणे

Pune Fraud : दीड वर्षांत दुप्पट नफ्याचे आमिष; माजी सैनिकांची ७३ लाख रुपयांची फसवणूक

गुंतवणुकीवर दीड वर्षांत दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून माजी सैनिकांसह त्यांच्या नातेवाइकांची सुमारे ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गुंतवणुकीवर दीड वर्षांत दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून माजी सैनिकांसह त्यांच्या नातेवाइकांची सुमारे ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका माजी सैनिकासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी राजेश गोरख यादव (वय-४०, रा. खेंगरेवाडी, ता. पुरंदर) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरेंद्र बाळू पवार (वय-४१, रा. मालेगाव, नाशिक), माजी सैनिक गणेश माळवदे (वय-४२, रा. छत्रपती संभाजीनगर), प्रफुल्ल कांबळे (वय-४२, रा. पुणे), शुभांगी पवार (वय-३६, रा. मालेगाव, नाशिक), स्वप्नील ठाकरे (वय-३८, रा. मुंबई), संदीप मुळे (वय-३८, रा. पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यादव लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यांची एका माजी सैनिकामार्फत माळवदेशी ओळख झाली. त्याने यादव यांना नरेंद्र पवारच्या समृद्ध भारत ट्रेडिंग सर्व्हिसच्या गुंतवणूक योजनेची माहिती दिली. तसेच, आरोपींनी सेमिनारचे आयोजन केले.

त्यांना गुंतवणूक केलेली रक्कम २० महिन्यांत दुप्पट आणि मूळ गुंतवणुकीवर दरमहा १० टक्के रक्कम परत देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार १९ माजी सैनिक आणि त्यांच्या नातेवाइकांनी योजनेत गुंतवणूक केली. परंतु आरोपींनी त्यांना मुद्दल आणि व्याज परतावा दिला नाही. आरोपी खराडीतील कार्यालय बंद करून पसार झाले. चंदननगर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT