पुणे

पारनेर - नोकरीचे आम्हीच दाखवून 34 लाखाची फसवणूक

CD

भरतीचे आमिष दाखवून ३४ लाखांची फसवणूक

बनावट नियुक्तीपत्र देणारा आरोपी जेरबंद; पारनेर पोलिसांची साताऱ्यात कारवाई

पारनेर, ता. १९ ः सैन्यदलात भरती करण्याचे आमिष दाखवून बनावट ई-मेल, संदेश आणि नियुक्तीपत्र पाठवत ३४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. आरोपीने शेतकरी कुटुंबाची फसवणूक करून ही रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरती रमेश सोनवणे (वय ३६, रा. वडुले, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

मोहन महादेव काकडे (रा. विठ्ठल मंदिराशेजारी, रुई, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काकडे याने बेळगाव (कर्नाटक) येथील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे फिर्यादीला सांगितले. फिर्यादी यांचा मुलगा दीपाराज सोनवणे (वय १७) याच्यासह अन्य काही जणांना सैन्यदलात भरती करून देण्याचे आश्वासन त्याने दिले. भरती न झाल्यास पैसे परत करण्याचेही त्याने सांगितले होते.

आरोपीने स्वतःच्या टॅबमध्ये बनावट ई-मेल आयडी तयार केला. त्यानंतर ‘बेळगाव केंद्रात भरती झाली असून, प्रशिक्षणासाठी हजर रहा,’ असे खोटे संदेश, तसेच स्वाक्षरी नसलेले बनावट नियुक्तीपत्र व्हॉट्सॲपद्वारे पाठवले. या माध्यमातून फिर्यादी आणि साक्षीदारांकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३४ लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली.

या प्रकरणाचा तपास करताना पारनेर पोलिसांनी सातारा जिल्ह्यात शोध घेऊन आरोपीला अटक केली. या कारवाईत पोलिस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक जी. एस. डहाळे, हवालदार डी. जी. अकोलकर, डी. एम. कैतके, तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंड आणि अरुण सांगळे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

Latest Marathi News Live Update : प्यारे खान यांच्या भेटीनंतर गरबा मंडळाचं शुद्धीकरण

Gold For India : अचूक निशाणा अन् नवा इतिहास! पॅरा नेमबाज मोना अग्रवालने जिंकलं 'सुवर्णपदक'; पंतप्रधानांची भावूक पोस्ट

Asian Para Games 2026: भारतीय खेळाडूंचा ऍथलेटिक्समध्ये सुवर्ण व रौप्य पदकांचा 'डबल धमाका'! सौम्या, राधा अन् रिंकू-अजीतची कमाल

SCROLL FOR NEXT