Army recruitment scam Pune Maharashtra Commissioner of Police Amitabh gupta  
पुणे

मोठी बातमी: सैन्य भरतीच्या पेपर फुटीचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर

सकाळवृत्तसेवा

पुणे: ''पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लष्कर भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फोडणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून त्यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात लष्कराच्या मोठ्या अधिकाऱ्याचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.''अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

लष्करात भरतीसाठी लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडून तरुणांची आर्थिक फसवणूक करणारे मोठे रॅकेट लष्करी गुप्तचर विभागाच्या मदतीने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उद्धवस्त केले. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. याच पद्धतीने राज्यातील तरुणांची फसवणूक झाल्याची शक्‍यता असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान याबाबत  पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दरम्यान, ''या प्रकरणाचे धागेदोरे अन्य राज्यात असल्याची माहिती मिळत असून गुन्हा व्यापक व संवेदनशील असल्याने तपासासाठी 'एसआयटी'ची स्थापना करण्यात येणार आहे.'' असे सांगितले. 

लष्कर भरतीच्या नावाखाली फसवणूक;गुन्हे शाखेकडून दोघांना अटक 

लष्कर भरती घोटाळासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले आणि पत्रकार परिषद संपवून काढता पाया घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT