Army-Tank 
पुणे

Video : रणगाड्यांच्या युद्धसरावचे आयोजन पहा कसे असते

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पहिल्या महायुद्धापासून रणगाड्यांचा वापर लष्करी मोहिमेसाठी केला जात आहे. बदलत्या काळात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर लष्करी मोहिमांसाठी केला जात आहे. त्यामुळे रणगाड्यांनी आपले महत्त्व आणि उपयुक्तता सिद्ध केली आहे. शंभर वर्षांनंतरही रणगाड्यांचे महत्त्व कमी झालेले नसून, कोणत्याही परिस्थितीत ते कालबाह्य होणार नाहीत, असे मत आर्म्ड कोर अँड स्कूल अँड मॅकेनाइज्ड इनफंटरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस. झा यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

नगर येथील के. के. रेंज या ठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मेजर जनरल झा म्हणाले, ‘‘तोफांचा मारा करण्याची क्षमता, संरक्षण आणि गतिशीलता या तीन बाबतीत रणगाडे युद्धात महत्त्वाची भूमिका निभावतात. युद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर करून, लष्करी मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य सर्वोच्च दर्जाचे असणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने भारतीय लष्कराकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. दहशतवादी कारवायांचा बीमोड करताना तसेच शत्रुराष्ट्रांच्या सीमारेषेवर संरक्षणाच्या दृष्टीने रणगाड्यांचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. त्याद्वारे सैन्याला अधिक सुरक्षा मिळू शकते तसेच आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करणे शक्‍य होते. सैनिकांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी के. के. रेंज परिसर विस्तारीकरण प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून, त्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे.’’

भारतीय सैन्यदलाचे प्रशिक्षण दर्जेदार
भारतीय लष्कराच्या कर्तृत्वाला जोड देणारे रणगाडे आणि इतर लष्करी साधनसामग्रीबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संख्याबळ थोडेफार सारखे आहे. मात्र, भारतीय लष्कराला मिळणारे प्रशिक्षण पाकिस्तानच्या तुलनेत दर्जेदार आणि अद्ययावत असल्यामुळे तसेच आपल्या सैनिकांचे मनोबल उच्च दर्जाचे असल्याने भारतीय सैन्यदले सक्षम ठरतात, असे मत झा यांनी या वेळी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT