पुणे

एखादी वस्तू पोचवायची आहे? आम्ही पोचवू... सायकलवरून! 

सलील उरुणकर

पुणे - एखादी वस्तू एका ठिकाणावरून दुसरीकडे पोचविण्यासाठी तुम्ही काय करता? पक्के पुणेकर असाल, तर थेट "बाइक'ला किक मारून निघणार... बरोबर ना? पण याच शहरात असेही काही मुले-मुली आहेत जे बाइकऐवजी सायकल वापरतात.. फक्त स्वतःसाठीच नाही, तर दुसऱ्या कोणाचे काम असेल तरीही ते अशीच सेवा पुरवतात आणि हे सर्व कशासाठी तर पर्यावरणासाठी..! 

नेहा जोशी, कल्याणी जोशी, वर्षा वर्तक, सौरभ आडकर, सोहम सबनीस, निखिल जोशी, अक्षय गद्रे, मयूर देशपांडे, ओंकार जोशी, प्रसाद कुलकर्णी, प्रसाद शाळिग्राम, अक्षय आपटे, उदित देशपांडे, कौस्तुभ हिंगे अशी या मुला-मुलींची नावे आहेत. बहुराष्ट्रीय व आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांपासून ते सायकल शोरूमचा आणि डिजिटल मार्केटिंग कंपनीचा मालकाचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. "अर्न ब्लेसिंग्ज ग्रुप' नावाने गेली चार वर्ष सुरू असलेला हा ग्रुप "सायकलिंग'ला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. 

पर्यावरण संवर्धनासाठी राबविणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती देताना सौरभ म्हणाला, ""बऱ्याचदा एखादी छोटी वस्तू देण्या-घेण्यासाठी अनेक जण मोटारी किंवा दुचाकींचा वापर करतात. ही वाहने रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, त्याचबरोबर प्रदूषण वाढण्यालाही ते कारणीभूत ठरतात. अशा कारणांसाठी वाहने रस्त्यावर येऊच नये, यासाठी आम्ही विशेष सेवा सुरू केली. आमच्या परिचितांचे फेसबुक, व्हॉट्‌सऍप ग्रुप आहेत. त्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते. वाहनांऐवजी सायकलचा वापर करून आम्ही ती वस्तू नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही आमचा खारीचा वाटा अशा पद्धतीने उचलत आहे.'' 

""काही स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याच्या उद्देशानेही आमचा ग्रुप काम करतो. या संस्थांना लागणाऱ्या वस्तू, आर्थिक मदत स्वतः देणे तसेच इतरांकडून मिळवून देण्याचे आम्ही प्रयत्न करतो,'' असेही सौरभने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT