पुणे

नागठाणे शौर्य पुरस्कार मानकरी

CD

आलेवाडीच्या अर्पितचा दिल्लीत होणार गौरव

शौर्य पुरस्काराचा ठरला मानकरी; प्रजासत्ताकदिनी संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान

सुनील शेडगे ः सकाळ वृत्तसेवा

नागठाणे, ता. १६ : जावळी तालुक्यातील आलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा अर्पित हा यंदाच्या शौर्य पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी आयोजित सोहळ्यात देशाच्या संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते त्याचा गौरव होणार आहे.
अर्पित अविनाश जाधव हा हरहुन्नरी विद्यार्थी. तो सहावीच्या वर्गात शिकतो. सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांच्या शौर्य अन् बलिदानाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी तसेच शूरांच्या प्रेरक जीवनकथा विद्यार्थ्यांत रुजविण्यासाठी दरवर्षी वीरगाथा प्रकल्प आयोजिला जातो. यंदाच्या वीरगाथा ५.० या प्रकल्पात अर्पित सहभागी झाला होता. त्यात राष्ट्रीय स्तरावरून १०० सर्वोत्तम विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवडलेल्या ‘सुपर हंड्रेड विनर्स’ यादीत अर्पित याने देशात प्रथम येण्याचा बहुमान संपादन केला आहे. त्यातून गावाचे, शाळेचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. ‘सकाळ उपक्रमशील मंच’चे सदस्य नितीन जाधव, प्रियांका किरवे यांच्यासह अप्पासाहेब निकम, मेघा इथापे या शिक्षकांचे मार्गदर्शन त्याला लाभले.

अर्पितला दहा हजार रुपयांच्या पारितोषिकासह शौर्य पुरस्कार, प्रमाणपत्र अन् पदक प्रदान केले जाणार आहे. या निमित्ताने देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याचा गौरव होणार आहे. विशेष अतिथी म्हणून त्याला प्रजासत्ताक दिनाचा संचलन सोहळाही पाहण्याची संधी लाभणार आहे. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, उस्मान मणेर, मिलन मुळे, उमेश भोसले, केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप, वंदना गंगावणे, सुभाष दुटाळ, दत्तात्रय बाचल तसेच ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.

चौकट

जिल्हा परिषद शाळेस प्राधान्य

अर्पितचे कुटुंब हे जावळी तालुक्यातील भिवडी गावचे. त्याचे वडील अविनाश जाधव अन् आई दीपा हे दोघेही सुशिक्षित पालक. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी कोणत्याही खासगी शाळेची निवड न करता दर्जा अन् गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या आलेवाडीच्या प्राथमिक शाळेस प्राधान्य दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : पुण्यातील प्रभाग २९, ३० मतमोजणी केंद्रावर गोंधळ

PCMC Election Winning candidate list: अजितदादांना सर्वात मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडच हातातून गेली, संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी वाचा

Jalgaon Municipal Election Results : जळगावात महायुतीची एकहाती सत्ता, विरोधकांना मोठा धक्का; विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

KDMC Election Result 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता? विजयी उमेदवारांची यादी समोर

Malegaon Municipal Result : मालेगावात भाजपाचा सुपडा साफ; पालिका हातातून गेली, इस्लाम पार्टीचा दणदणीत विजय, शिवसेनेला किती जागा?

SCROLL FOR NEXT