3arrested_54.jpg
3arrested_54.jpg 
पुणे

पुणे : आंतरजातीय विवाह केल्यामुळे मेव्हण्यावर गोळीबार करणारे अटकेत

सकाळवृत्तसेवा

पुणे : बहिणीसोबत आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मेव्हण्यावर गोळीबार करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली.

आकाश लहू तावरे (वय 22),  सागर लहू तावरे (वय 24) आणि सागर रामचंद्र पालवे (वय 21, तिघे रा. राजे, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तुषार प्रकाश पिसाळ (वय 20 रा. राजेगाव ता. भोर) याचा आरोपीच्या बहिणी समवेत झाला आहे. मुलीच्या नातेवाईकांचा या लग्नाला विरोध होता. त्यांच्यात यापूर्वी वाद असल्यामुळे तुषारला मुलीच्या नातेवाईकांकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून मुलीचा भाऊ आकाश तावरे आणि सागर तावरे, चुलत भाऊ राजू तावरे आणि त्याचा मित्र सागर पालवे यांनी संगनमत करून तुषारवर चांदणी चौकात गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी हिंजवडी पोलीस चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळीबार केल्यानंतर आरोपी बाहेर गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना युनिटच्या पथकातील पोलीस हवालदार सुनिल पवार यांना आरोपी जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, युनिट चारचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT