GST Bhavan
GST Bhavan Sakal
पुणे

GST Department Pune : ७० कोटींची बनावट बिल्स सादर केलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील वस्तू आणि सेवाकर विभागाने राबवलेल्या एका तपास मोहिमेमध्ये ओलायन डेस्कॉन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीएसटी विभागाच्या पुण्यातल्या टीमने ही कारवाई केली आहे. या कंपनीचे चार मुख्य पुरवठादार बनावट असल्याचं आढळून आलं आहे.

या चार पुरवठादारांनी बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून फसवणूक करत आपली जीएसटी नोंदणी केली आहे. याप्रकरणी या पुरवठादारांची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी झाली. यामध्ये असं आढळून आलं की, सिराजुद्दीन कमालुद्दिन चौधरी, वय - २९ वर्षे यांनी सामानाच्या मूळ पावतीशिवाय ७०.२२ कोटी रुपयांची बनावट बिल्स सादर केली आहेत. तसंच ओलायन डेस्कन कंपनीमध्ये १२.५९ कोटींचं बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट दाखवलं आहे.

सिराजुद्दीन हा फरार होता, आणि उत्तर प्रदेशात लपला होता. त्याला पकडण्यासाठी विशेष तपास पथक तयार करुन उत्तर प्रदेशात पाठवण्यात आलं. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने शोधण्यात आलं आणि १० मार्च २०२३ रोजी त्याला अटक केली. मुख्य न्यायदंडाधिकारी सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश यांनी ट्रान्झिट रिमांड अंतर्गत मुख्य न्यायदंडाधिकारी पुणे यांच्यासमोर हजर केले. आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई जीएसटी विभागाच्या पुणे शाखेचे अतिरिक्त आय़ुक्त धनंजय आखाडे, सहआयुक्त दीपक भंडारे आणि उपायुक्त मनिषा गोपाले भोईर यांनी केली. राज्य आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन सांगळे, दत्तात्रय तेलंग, सतिश लंके आणि सतिश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. यांच्यासोबत इतरही काही आयकर विभागाचे अधिकारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.

२०२२ -२३ या वर्षातली महाराष्ट्र जीएसटी विभागाने केलेली ही ६८ वी अटक आहे. आरोपी जरी दुसऱ्या राज्यामध्ये लपलेला असता, तरीही विभागापासून वाचू शकत नाही, असा इशारा या अटकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या आधीही विभागाने अशा प्रकारची कारवाई करत आरोपींना गुजरात, गोवा अशा राज्यांतून ताब्यात घेतलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT