agitation sakal
पुणे

Dhayari Crime : खुनातील आरोपींच्या अटकेसाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनसमोर नातेवाईकांचा ठिय्या

सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे काल रात्री घडलेल्या खुनातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा संतप्त पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला.

विठ्ठल तांबे

धायरी - सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे काल रात्री घडलेल्या खुनातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा संतप्त पवित्रा घेत मृताच्या नातेवाईकांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. धायरी परिसरात रात्री पासून वातावरण तणाव होते. आज सकाळी देखील तणाव पूर्ण वातावरण धायरी गावात पहावयास मिळाले.

काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आदित्य पोकळे या तरुणाची धायरी येथील पाटलाची माची परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ निर्घृण हत्या करण्यात आली होती. जमीनीच्या वादातून जवळच्या नातेवाईकाकडूनच ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून संपत काळोखे (रा. नांदोशी) व सागर रायकर (रा. धायरी) अशी आरोपींची नावे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मृत तरुणाची आई, बहीणी व इतर चाळीस ते पन्नास नातेवाईक पोलीस स्टेशनसमोर येऊन बसले होते. यावेळी पोलीस निरीक्षक व उपायुक्तांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT