Crime
Crime 
पुणे

एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा करून नागरीकांचे पैसे लंपास करणाऱ्यास अटक 

सकाळवृत्तसेवा

पुणे - एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरीकांना मदत करण्याचा बहाणा करून हातचलाखीने डेबीट कार्डची बदली करून नागरीकांच्या बॅंक खात्यातील रक्कम चोरणाऱ्या चोरट्यास सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून 27 एटीएम कार्ड व 50 हजार रुपयांची रोकड जप्त केली. 

संबंधीत गुन्हेगाराचा याच पद्धतीने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीशी संबंध असून त्यादृष्टीने सायबर पोलिसांकडून तपास केला जात आहे. 

अनुप शिवनारायण पाझरे (वय 33, रा. फुरसुंगी, मुळ रा. नागपुर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या एका कारागीराला एटीएम मशीनमधुन पैसे काढून देण्याचा बहाणा करुन एकाने हातचलाखीने कारागीराचे डेबीट कार्ड बदलून त्यास बनावट डेबीट कार्ड दिले. त्यानंतर कारागीराकडील डेबीट कार्डचा वापर करून 74 हजार 760 रुपये काढून घेतले. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, पोलिस आरोपीचा शोध घेत होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, दाखल गुन्ह्याचे तांत्रिक विश्‍लेषण केल्यानंतर अनुप पाझरे या व्यक्तीने संबंधीत प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सायबर पोलिसांनी त्यास सांगवी येथील एसबीआयच्या एटीएम केंद्रासमोरुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली, त्यावेळी त्याने हा गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली, त्यावेळी पोलिसांना तेथे वेगवेगळ्या बॅंकांची 27 एटीएम कार्ड, 50 हजार रुपयांची रोकड, सोनसाखळी असा ऐवज जप्त केला. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. 

आरोपीविरुद्ध तेलंगाणासह राज्यात विविध ठिकाणी 7 गुन्हे दाखल 
अनुप पाझरे याच्याविरुद्ध तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, नागरपुरमधील हिंगणघाट, सावनेर,उमरखेड, खापरखेडा, कामाठी अशा पोलिस ठाण्यामध्ये 7 गुन्हे दाखल आहेत. तर पुण्यात कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये याच पद्धतीने नागरीकांच्या पैसे लंपास केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT