pune crime sakal
पुणे

मुलाचे अपहरण करुन वडीलांकडे खंडणी मागणाऱ्यास अटक

गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातुन अपहरण झालेल्या मुलाच्या वडीलांना मुलाची माहिती देतो, असे सांगून त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

आनंद उर्फ अक्षय हनुमंत शिर्के (वय 27, रा. आळंदवाडी, ता. भोर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपुर्वी शहरातून एका लहान मुलाचे अपहरण झाले आहे. त्याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, मुलाची माहिती मिळावी, यासाठी त्याच्या पालकांनी फेसबुकवर नागरीकांना आवाहन केले आहे. त्यानुसार, शिर्के याने संबंधित माहिती वाचून मुलाच्या वडीलांच्या व्हॉटस्‌अपवर मेसेज केला.

त्यांना मुलाची व त्याला घेऊन जाणाऱ्या गाडीची माहिती पाठवतो असे सांगून त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी आगोदर माहिती व फोटो देण्याची मागणी केली, तेव्हा त्याने आगोदर पैशांची मागणी केली, असे मुलाच्या पालकांना सांगितले. त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने संबंधित तरुणाचा माग काढला. त्यानंतर त्यास भोरमधील आळंदवाडी येथून अटक केली. शिर्के हा आळंद येथील कंपनीत काम करत असून त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.मुलाच्या अपहणामुळे संबंधित कुटुंब चिंतेत आहे. असे असतानाही खोटी माहिती देऊन त्यांच्याकडे पैसे मागण्याचे कृत्य बेकायदेशीर आहे. अशा प्रकारच्या खोट्या माहितीचे फोन करुन त्यांना त्रास देऊ नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT