crime crime
पुणे

उधारी मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार करणारा अटकेत

दोनशे रुपये उधारी असताना पाचशे रुपये मागितल्याच्या रागातून वाद घालत डोक्यात कोयत्याने वार करून जखमी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक केले.

सकाळ वृत्तसेवा

उंड्री - दोनशे रुपये उधारी असताना पाचशे रुपये (Money) मागितल्याच्या रागातून वाद घालत डोक्यात कोयत्याने वार (Attack) करून जखमी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक केले. ससाणेनगरमधील गंधर्व हॉटेलशेजारी म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्यार रस्त्यावर १३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

दत्ता विठ्ठल भुसणे (वय २८, रा. गल्ली नं.११, ससाणेनगर, डी.पी. रोड, गंधर्व वाईनसमोर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय चोडमल (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, दोनशे रुपये उधारी असताना पाचशे रुपये मागू लागले, हे बरोबर नाही, असे सांगितले. याचा रागा आल्याने शिवीगाळ करीत लोखंडी कोयता काढून तुझी लायकी नसतानाही तू आमच्याशी वाद घालतो, तुला आज जिवंत सोडत नाही, असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या लोकांना हातातील कोयता वर करून कोणी वाचवण्यास आले, तर त्याला सोडणार नाही, आमच्याशी जो नडतो, त्याची आम्ही अशी अवस्था करतो, असे बोलून दहशत निर्माण केली. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT