theif.jpg
theif.jpg 
पुणे

चोरलेल्या शेळ्या वापरुन थाटले मटणाचे दुकान 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मटणाचे दुकान चालवण्यासाठी शेळ्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भोसरी पोलिसांनी दोन साथीदारांसह अटक केली आहे. त्यांच्याकडून १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक कार असा एकुण ६ लाख ३६ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. 

अल्तमश ऊर्फ पाप शब्बीर कुरेशी (वय 18, रा. घर नंबर टीसी 21, खडकी बझार, सुरती मोहल्ला) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर सोमेश अजय तायडे (वय 19, रा. घर नंबर 32, कॅन्टोमेंट कॉलनी, खडकी बझार) व रोहन राजेंद्र रिठे (वय 20, रा. घर नंबर 29, अरुणकुमार, वैद्य वसाहत, खडकी बझार) असे त्याच्या साथीदारांची नावे आहेत. दोन्ही आरोपी महाविद्यालीयन विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्तमशचे कासारवाडी येथे मटणाचे दुकान आहे. तो अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतो. परंतु, तो एक सराईत गुन्हेगार असून त्याने मोटार आणि दुचाकी चोरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी चोरी करताना तो मोटारीत शेळ्या चोरून आणत, त्याच्यामार्फत वेगवेगळ्या पाच पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

दरम्यान, साथीदार सोमेश आणि रोहन यांच्यासह तो नाशिक फाटा इथे चोरीची मोटार विक्रीसाठी आल्याची माहिती समीर रासकर या पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी जाऊन तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक तवेरा मोटार चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. चोरलेल्या शेळ्या अल्तमशच्या मटणाच्या दुकानात नेऊन हलाल करत आणि तेच मटण ग्राहकांना विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.  ही कारवाई निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलिस कर्मचारी गणेश हिंगे, विपुल जाधव, सुमीत देवकर, समीर रासकर, संतोष महाडीक, विकास फुले, आशिष फुले, आशिष गोपी, सागर भोसले, बाळासाहेब विधाते यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT