पुणे

पुणे : गुंतवणुकदारांच्या हातावर तुरी देऊन धूम ठोकली, पण...

जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

ऊरुळी कांचन (पुणे) : बेकायदेशीर गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह परिसरातील पाचशेहून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून मागील आठ महिन्यांपासून फरारी असलेल्या आरोपीला व त्याच्या दोन मुलांना गुजरात पोलिसांनी पाकिस्तानच्या सीमेवरुन रविवारी (ता. २०) अटक केली आहे. भरतकुमार चरणराज जोशी आणि त्याची दोन मुले हिरेन कुमार व दीपक कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, भरतकुमार जोशी या व्यापाऱ्याने मागील काही वर्षांपासून तीन वर्षांच्या मुदत व एका वर्षाच्या मुदतीवर एक लाख ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत भिशी चालवल्या होत्या. या व्यापार्‍याकडे उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह परिसरातील पाचशेहून अधिक मोठ्या व्यापारी व लोकांनी पैसे गुंतवणूक केले होते. व्यापाऱ्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविला आणि या भिश्यांत गुंतवणूकदारांचा आकडा शेकडो पर्यंत पोहोचवला.

भरतकुमार जोशी याने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात भिशीत गुंतवणूक करणाऱ्या शेकडो गुंतवणुकदारांच्या हातावर तुरी ठेऊन धूम ठोकली होती. तसेच ज्या ठिकाणी मोठमोठ्या भिशी लावल्या होत्या त्या अर्थवट ठेऊन सुरूवातीला भारतकुमार जोशी हा स्वत: उरुळी कांचन परिसरातून निघून गेला. व मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जोशी याच्या पत्नीला कोरोना झाल्यामुळे उरुळी कांचन परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर व्यापारी रातोरात स्वतः व नंतर परिवाराला घेऊन दोनशे कोटीहून अधिक रुपयांची माया गोळा करुन, आपल्या कुटुंबीयासह उरुळी कांचन येथून ऑगस्ट २०२० ला शेठ भरतकुमारने धूम ठोकली होती. त्यामुळे पूर्व हवेलीत एकच खबळबळ उडाली होती. या व्यापाऱ्याच्या घराकडे चकरा मारुन गुंतवणूकदार यांना चक्कर येऊ लागल्याने या प्रकाराचे भिंग फुटले होते. दरम्यान, भिशी चालविणारा व्यापारी फरार झाल्याने भिशीत पैसै अडकणाऱ्या केवळ ५ जणांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. तेव्हा जोशी याच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून भारतकुमार जोशी व त्याचे कुटुंबिय फरार होते. जोशी व त्याच्या दोन मुलांना पाकिस्तानच्या सीमेवर गुजरात पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT