पुणे

क्रीडांगण - किशोर पेटकर

CD

क्रीडांगण
आर्सेनल संघासमोर आव्हान
- किशोर पेटकर
--------------------------------------
लीड
इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटी संघाने स्पॅनिश प्रशिक्षक पेप ग्वार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७-१८पासून सुवर्णकाळ अनुभवला. २०२३-२४पर्यंत त्यांनी एकूण सहा वेळा प्रीमियर लीग किताब पटकावला, त्यापैकी सलग चार वेळा ते विजेते ठरले. मात्र मागील दोन मोसमांत या संघाला अपेक्षित यश मिळाले नाही.
--------------------------------------

जगभरातील व्यावसायिक फुटबॉलमध्ये इंग्लिश प्रीमियर लीगला सर्वाधिक लक्षवेधी मानले जाते. स्पर्धेच्या ३५व्या मोसमाला गतविजेता आर्सेनल आणि पदोन्नती मिळालेल्या कॉव्हेन्ट्री सिटी या संघातील लढतीने सुरुवात झाली. अपेक्षेनुसार आर्सेनल संघाने एकतर्फी विजयासह मोहिमेस सुरुवात केली. प्रीमियर लीगला सुरुवात होण्यापूर्वी ‘द गनर्स’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या आर्सेनल संघाने मँचेस्टर सिटीला सहज नमवून एफए कम्युनिटी शिल्डवर नाव कोरले होते. पुढील वर्षी ३० मेपर्यंत चालणाऱ्या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये आर्सेनल संघ निश्‍चितच विजेतेपदासाठी स्पर्धक असेल, पण वाटचाल सहजसोपी नसेल. मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, ॲस्टन व्हिला, लिव्हरपूल हे गतवेळचे पहिल्या पाच क्रमांकावरील संघ, तसेच चेल्सी, एव्हरटन हे संघही जेतेपदाच्या शर्यतीत असतील. साहजिकच आर्सेनल संघासमोर आव्हान खडतर असेल. एकूण २० संघांच्या या तुल्यबळ स्पर्धेत कॉव्हेन्ट्री सिटीसह इप्सविच टाऊन, हल सिटी या संघांना पदोन्नती मिळाली आहे, त्यांनाही स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. फ्रँक लँपार्ड यांच्या मार्गदर्शनाखालील कॉव्हेन्ट्री सिटी संघ तब्बल २५ वर्षांनंतर प्रीमियर लीग स्पर्धेत दाखल झाला आहे. नावाजलेला संघ  मँचेस्टर युनायटेड २०१२-१३नंतर इंग्लिश प्रीमियर लीग जिंकू शकलेला नाही. ते दीर्घकालीन प्रतीक्षा संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असतील. या संघातून दीर्घकाळ खेळलेले खेळाडू कॅरिक यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेडला गतवैभवाची अपेक्षा आहे. एकमात्र खरे, मागील दोन मोसम बघता, या वेळच्या मोसमात नवा विजेता संघ जल्लोष करताना दिसल्यास नवल वाटू नये.

मँचेस्टर सिटीसाठी नवा मार्गदर्शक
मँचेस्टर सिटी संघाने स्पॅनिश प्रशिक्षक पेप ग्वार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७-१८पासून सुवर्णकाळ अनुभवला. २०२३-२४पर्यंत त्यांनी एकूण सहा वेळा प्रीमियर लीग किताब पटकावला, त्यापैकी सलग चार वेळा ते विजेते ठरले. मात्र मागील दोन मोसमांत या संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. २०२४-२५मध्ये लिव्हरपूलने, तर गतमोसमात आर्सेनलने बाजी मारली. उपविजेतेपद मिळालेल्या मँचेस्टर सिटीच्या खात्यात सात गुण कमी जमा झाले. मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षकपद ग्वार्डिओला यांनी सोडल्यानंतर त्यांच्या जागी एन्झो मारेस्का आले आहेत. हुकमी खेळाडू रॉड्री आणि बर्नार्डो सिल्वा यंदा मँचेस्टर सिटी संघात नाहीत. आर्सेनल संघाचे प्रशिक्षक मिकेल आर्तेता यांच्यावरही लक्ष असेल. या स्पॅनिश मार्गदर्शकाने संघाची मजबूत बांधणी केली आहे. तब्बल २२ वर्षांनंतर आर्सेनल संघाचे इंग्लिश प्रीमियर विजेतेपदाचे स्वप्न साकार झाले. २०१९पासून आर्सेनलचे प्रशिक्षक असलेल्या आर्तेता यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने प्रीमियर लीग व एफए कम्युनिटी शिल्ड जिंकून अपेक्षा उंचावल्या आहेत. स्पॅनिश झाबी अलोन्सो (चेल्सी), अँडोनी इराओला (लिव्हरपूल), मायकेल कॅरिक (मँचेस्टर युनायटेड) या प्रशिक्षकांकडूनही अपेक्षा असतील.

वैयक्तिक कामगिरीकडे लक्ष
यावेळची विश्‍वकरंडक स्पर्धा गाजविलेला एर्लिंग हालांड हा खेळाडू मँचेस्टर सिटीचा हुकमी एक्का आहे. गतमोसमात त्याने सर्वाधिक २७ गोल केले होते, तर मँचेस्टर युनाटेडचा ब्रुनो फर्नांडिस सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. आर्सेनल संघात बुकायो साका, मार्टिन ऊडेगार, काय हावर्ट्स यांच्या सोबतीला ब्रुनो गुइमारेस आला आहे. लिव्हरपूल संघाला मात्र महंमद सालाह याची अनुपस्थिती निश्‍चितच जाणवेल.  लिव्हरपूलचे फ्लोरियान व्हिर्ट्स व अलेक्झांडर इसाक, चेल्सी संघाचा कोल पाल्मर या खेळाडूंना छाप पाडण्याची संधी असेल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident : मुलाच्या जन्माचा आनंद क्षणात शोकात बदलला; उत्सवात बस घुसली, १८ जणांना चिरडलं, ५ जणांचा मृत्यू

Kolhapur Mahamandal Appointments : भाजप 48, शिंदे गट 29 अन् अजितदादा गट 23 टक्के! महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; इच्छुकांची वाढली धडधड

मी नखरे केले असते तर... मराठमोळ्या मानसी साळवीने सांगितलं 'महादेव अँड सन्स' मालिका सोडण्याचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यात काँग्रेसच्या गुंडगिरीचा आरोप; विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी धमकावल्याचा राम सातपुतेंचा दावा

Koyna Dam Water Storage : कोयना धरण 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! आजच गाठणार टप्पा? महाबळेश्वर, नवजात पाऊस मंदावला; पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT