पुणे

‘झेन झीं’साठी महाविद्यालयीन व्यासपीठ महत्त्वाचे

CD

चाकण, ता. २० : ‘झेन झेड’मधील विद्यार्थ्यांस विविध कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयीन व्यासपीठ फार महत्त्वाचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केले.
चाकण (ता. खेड) येथील नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. भागूबाई पिंगळे कला, वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालयात कलाविष्कार स्पर्धा व बक्षीस वितरण उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना आदरांजली वाहून करण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती पिंगळे, सचिव शितल टिळेकर, संस्थेचे समन्वयक ज्ञानेश्वर दुधवडे, प्राचार्य डाॅ. बाळकृष्ण झावरे, उपप्राचार्य प्रा. संतोष बुट्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल ठोंबरे, प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. देसाई, चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे आदी उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. डाॅ. देसाई यांनी आजच्या जनरेशन झेडचा उल्लेख करीत महाविद्यालयीन व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष पिंगळे यांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कला, क्रीडा क्षेत्रातही प्राविण्य मिळवावे असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गायन, एकल नृत्य, समूह नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रियंका सलगर, सानिका मोरे,  दिया खरपूडे, सिद्धी गोरे, पूजा  भुजबळ, श्रुतिका दौंडकर, तन्वी इंगळे, वैष्णवी  कड, जय क्षीरसागर, आदित्य शहा, केतन जैद, प्रियंका बालघरे हे विद्यार्थी बक्षिसपात्र ठरले. तर, निबंध स्पर्धेत श्रावणी  भाडळे, वक्तृत्व स्पर्धेत सृष्टी  कोळेकर, हस्ताक्षर स्पर्धेत वैष्णवी  कड, तर मराठी स्वाक्षरी स्पर्धेत सई  मराठे या मुलींनी बाजी मारली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केतन जैद, प्रा. सुरज गारगोटे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. संतोष बुट्टे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT