Panchnama 
पुणे

साडीचे ‘विंडो शॉपिंग’

सु. ल. खुटवड

‘शी !  हा किती भडक रंग आहे, हा नको. याच्यात मोरपंखी रंग दाखवा. तो नको. बैंगणी रंग मला खुलून दिसत नाही. या.. या पॅटर्नमध्ये चार-पाच कलर दाखवा...
‘असलं घाणेरडं नको, कांजीवरममधील व्हरायटी दाखवा बरं.’’ आमच्या पुढ्यात तीस-चाळीस साड्यांचा ढीग साचला होता आणि बायको प्रत्येक साडीमध्ये काहीतरी उणीव दाखवून, त्या साड्या नापसंत करीत होती. मी मात्र दुकानदाराच्या रागाचा पारा केव्हाही चढेल म्हणून आपण त्या गावचेच नाही, असा चेहरा करून ‘शेजारची साडीखरेदी’ बघत बसलो होतो. डोळ्यांना छान वाटत होतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘हा पॅटर्न नेव्ही ब्लूमध्ये नको, आकाशी कलरमध्ये दाखवा बघू. असली सेम साडी आमच्या शेजारणीकडे आहे. तिला अजिबात ती शोभून दिसत नाही. 
उगाचंच निळ्या रंगाचं बुजगावणं उभं केलंय, असं वाटतं. काय हो बरोबर ना.’’ या प्रश्‍नावर मी भानावर आलो.  
‘तू म्हणतेस ते बरोबर आहे. शेजारच्या रजनी वहिनींना नेव्ही ब्लूमधील साडी अजिबात चांगली दिसत नाही. मी ही त्यांना चार-पाच वेळा तसं सांगितलंय. पण त्या ऐकतील तर ना.’’ 
‘तुम्हाला कोणी चोंबडेपणा करायला सांगितलाय.’’ असं तिने म्हटले आणि परत ती साडी खरेदीत गुंतली. थोड्या वेळानं ‘अगं उरक लवकर, उशीर होतोय,’ हे वाक्‍य मी चुकून बोललो. त्यावर ती एकदम भडकली.
‘तुम्ही अजिबात घाई करू नका. लग्नाच्यावेळीस मी घाई- गडबडीत तुम्हाला होकार दिला आणि त्याची फळे आता मी भोगतेय. साडीखरेदीत आता तरी घाई करू नका. ’’ असे म्हणून ती माझ्यावर खेकसली. तासाभराने तिने एक साडी पसंत केली. खरं तर ही साडी दुकानदाराने पहिल्यांदाच दाखवली होती. पण दोन तास साड्या पाहिल्या नाहीत, तर खरेदीचा आनंद मिळत नाही, यावर तिचा ठाम विश्‍वास आहे.  
‘छान आहे ना साडी.’’ हा प्रश्‍न मला विचारला होता. अर्थात माझ्या पसंती- नापसंतीचा खरेदीवर काही परिणाम होणार नव्हता, याची मला खात्री होती.

‘छान आहे. सुंदर!’’ मी शेजारच्या साडीखरेदीवरील लक्ष न काढता म्हटले. 
‘या साडीची किंमत नीट सांगा. आमच्या यांच्या गबाळ्या ध्यानाकडे पाहून किंमत वाढवू नका.’’ अपमानाची एकही संधी न सोडता बायको म्हणाली.
‘फक्त दोन हजार रुपये. असली साडी आख्ख्या पुण्यात तुम्हाला कोठं मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला दिल्लीला जावे लागेल.’’
‘छे- छे. दोन हजार रुपये फार होतात. नीट जमवून द्या. ’’
‘ठीक आहे. १९०० रुपये द्या.’’

‘नेहमीच्या गिऱ्हाइकाला असं बनवू नका. गेल्या काही वर्षांपासून मी येथूनच साडी खरेदी करत आहे.’’ बायकोनं ठेवणीतलं अस्त्र बाहेर काढलं.  
‘पण मॅडम, दुकान तर दोन दिवसांपासूनच सुरू झालंय.’’ दुकानदाराच्या या वाक्‍यावर बायकोचा चेहरा पडेल, असं वाटलं. पण आपण काही ऐकलंच नाही, या आविर्भावात तिने ‘ही साडी आठशे रुपयांत द्या’ अशी मागणी केली. बराचवेळ भावाची घासाघीस सुरू होती. पण व्यवहार काही जुळत नव्हता. तेवढ्यात बायकोचं लक्ष खिडकीकडे गेले व ती घाई करत मला म्हणाली, ‘‘चला.. चला पाऊस आता थांबलाय आणि पुढच्यावेळी घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट जवळ ठेवत जा. वेंधळे कोठले’’ आणि दुकानदाराकडे पहात म्हणाली, ‘‘पुढच्यावेळीस साडीखरेदी तुमच्याकडे नक्की करीन हो.’’ असे म्हणून बायको निघाली. दुकानदार मात्र हात चोळत बसला.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT