Panchnama
Panchnama 
पुणे

साठीचा एक्का अन्‌ आम्हाला धक्का

सु. ल. खुटवड

वेळ - सायंकाळ चारची, स्थळ - शनिपारजवळील पीएमपीचा थांबा. पुण्यात हिवाळा व पावसाळा एकत्रच सुरू असल्याने अंगात स्वेटर, डोक्‍यात कानटोपी व हातात छत्री घेतलेले एक साठीचे गृहस्थ बसची वाट पाहत होते. तेवढ्यात आम्ही पॅड व पेन घेऊन पुढे सरसावलो. 
आम्ही : नमस्कार आजोबा. 
आजोबा : तुमचे पाकीट हरवले असेल व घरी जायला पैसे नसतील वा तीन दिवसांपासून तुम्ही उपाशी असाल तरी मी तुम्हाला पैसे देणार नाही. आतापर्यंत चौघांनी फसवलंय मला. निघा तुम्ही. 

आम्ही : अहो, आमच्या चेहऱ्यावर कायम पाकीट हरवल्याचे भाव असल्याने तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही आता कोठे चालला आहात? 
आजोबा : वैकुंठ स्मशानभूमीत. तुम्हाला काय करायचंय? 
आम्ही : अहो, तिथं जायला येथून बस जात नाही. नाहीतर तुम्हाला बसखाली तरी यावे लागेल. 
आजोबा : माझ्या मुलाप्रमाणे तुम्हीही माझ्या मरणाची वाट पहाताय का? अजून पंचवीस वर्षे मला काही होत नाही, सांगून ठेवतो.
आम्ही - एवढ्या खात्रीने कसं काय सांगता? यमराजाशी दोस्ती केलीय काय? (आम्हीही वाकड्यात शिरू शिकतो.) 
बरं तुम्ही पीएमपीने प्रवास करता की आणखी कशाने? 
आजोबा : आम्ही पीएमपीने प्रवास करू नाही तर विमानाने? तुम्हाला काय करायचंय? 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्ही : पुण्यात ‘मेट्रोची ‘बीआरटी’ होणार की मेट्रो सुसाट धावणार’ या विषयावर आम्ही सर्वेक्षण करतोय. सकाळपासून १२२ जणांच्या मुलाखती घेतल्यात. एकजण सरळ बोलेल तर शपथ ! एकाने फक्त व्यवस्थित माहिती दिली. नंतर तो येरवड्याच्या बसमध्ये निघून गेला. बरं तुमचा व्यवसाय काय? 
आजोबा : लोकांना टोप्या घालण्याचा. 
आम्ही : पुण्याला मेट्रोची खरंच गरज आहे का ? 
आजोबा : मग काय हेलिकॉप्टरची गरज आहे का? 
आम्ही : मेट्रो आल्यानंतर तुम्ही त्यातून प्रवास करणार का? 
आजोबा : पंचवीस वर्षात मेट्रो आली तर प्रवास करणार. नाहीतर नाही. स्वर्गात मेट्रो असेल तर तिथे प्रवास करू?

आम्ही - तुम्ही स्वर्गातच जाणार कशावरून? चंद्रगुप्ताला लाच द्यायचा विचार आहे का? बरं ते जाऊ द्या. मेट्रोचे भवितव्य काय असेल?
आजोबा - मेट्रोचं भवितव्य जाऊ द्या. तुमच्या भवितव्याचं बघा. तुमच्या राशीला मंगळ व शनीची युती झाल्याने तुमचे हाल सुरू आहेत. तुमच्याशी कोणीही सरळ बोलत नाही. अगदी घरी बायकोसुद्धा. आता सकाळपासून तुम्ही १२२ जणांशी बोललात. एक सोडून सगळेच तुमच्याशी फटकून वागले. तसेच सतत आर्थिक तंगी तुम्हाला जाणवते. आम्ही चेहऱ्यावरून भविष्य ओळखतो. तुम्ही पोवळा व मोती हे रत्न असलेली अंगठी घातली तर या चक्रव्यूहातून कायमची सुटका होईल व तुमची भरभराटही होईल.

आम्ही - पण ही अंगठी कोठे मिळेल? 
आजोबा - माझ्याकडे आहे. आठ हजार तिची किंमत आहे. मात्र, तुम्ही फारच साधे-भोळे व गरीब दिसत असल्याने पाच हजारात देतो.
त्यावर आम्ही पाच हजार रुपये काढून आजोबांच्या हातावर ठेवले. त्यांनी एक अंगठी आमच्या हाती दिली. त्यानंतर आलेल्या पहिल्या बसमध्ये आजोबा निघून गेले. आम्ही खूष होऊन अप्पा बळवंत चौकातील ‘उज्ज्वल भविष्यदर्शन’ या दुकानात ती अंगठी दाखवली. त्यावेळी तेथील मालकाने ही अंगठी फक्त दहा रुपयांची आहे, असे सांगितले. ते ऐकून आम्हाला मोठा धक्का बसला. ‘लोकांना टोप्या घालण्याचा माझा व्यवसाय आहे,’ हे 
आजोबांनी सांगितलेले खरे होते तर!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT