पुणे

पारगावचे चालते बोलते न्यायालय हरपले

CD

पारगावचे चालते बोलते न्यायालय हरपले

दौंड तालुक्यातील पारगाव येथील अरुण बोत्रे (सर) यांचे नुकतेच निधन झाले. यांच्या निधनाने स्पष्टोक्ते, प्रेमळ, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपले. ‘दिव्यत्वाची जिथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती’
या उक्तीप्रमाणे माध्यमिक शिक्षक म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पारगावचे सरपंचपद, तुकाई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष, तंटामुक्ती समिती पहिले अध्यक्ष, सुवर्ण नागरी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष आदी पदे भूषवताना सरांनी प्रत्येक पदाला न्याय दिला. गावातील बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनाने एक चालते बोलते न्यायालय हरपले, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

- डॉ. भरत खळदकर, नानगाव (ता. दौंड)

अरुण बोत्रे सरांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ४ ऑगस्ट १९४६ रोजी झाला. वडील चंद्रकांत बोत्रे हे पोलिस व आई कलावती या गृहिणी होत्या. सरांना तीन भाऊ व चार बहिणी, असा मोठा परिवार आहे. वयाच्या आठव्या वर्षी सन १९५४ मध्ये खेळताना पायाच्या घोट्यावर दगड पडला. चुलत्यांनी १० किलोमीटर अंतर कापून पाठीवर त्यांना केडगाव येथील दवाखान्यात नेले. परंतु तेथे सोय नसल्याने रेल्वेने ससून रुग्णालयात पुणे येथे दाखल केले. तेथे संसर्ग होऊ नये म्हणून मांडीतून पाय कापावा लागला. तेव्हापासून अपंगत्व हेच बलस्थान मानत जीवनाचा प्रवास सुरू केला.


एका पायाने सायकल चालवत गाठली दिल्ली
सरांनी माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण नूमवि विद्यालय व शाहू कॉलेज पुणे येथे पूर्ण केले. महाविद्यालयात शिकताना सन १९६६मध्ये सरांच्या चार मित्रांनी सायकलवर फिरायला जायचा बेत आखला. यासाठी सरांनी स्वतःची सायकल नसल्याने शुक्रवार पेठेतील नाईक सायकल येथून सायकल भाड्याने घेतली होती. नाशिकपर्यंत चौघेजण पोहोचले. प्रवास अवघड असल्याने इतर मित्र तिथून परत माघारी फिरले, परंतु सरांनी जिद्द न हरता प्रवासातील प्रेक्षणीय स्थळे पाहत एकट्याने दिल्ली गाठली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कौतुक करत त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान केला. भीमा नदीला पूर आला की पुराच्या पाण्यात पोहून नदी पलीकडे जायचा त्यांचा धाडसी स्वभाव होता. उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून ते प्रचलित होते. सन १९७३मध्ये सरांचा रश्मी चांदगुडे यांच्याशी विवाह झाला. राजेश, वैशाली व ॲड. वैभव या तीन अपत्यांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. दोन स्नुषांना वडिलांची माया दिली. नाती व नातवंडे यांच्याशी त्यांचा मैत्रीपूर्ण संबंध असायचा. गावामध्ये २० वर्षांच्या युवकापासून ते समकालीन मित्रांपर्यंत त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.


शिक्षण राज्य मंत्र्याच्या हस्ते पुरस्कार
सरांनी बी.कॉम. पूर्ण केल्यानंतर केडगाव आणि पडवी येथे शिक्षक म्हणून काम केले. खेड तालुक्यातील जवाहर विद्यालय चास कमान येथे बदली झाली. शाळेला शिस्त लावत ग्रामस्थांना सहभागी करून घेत शाळेची इमारत उभी केली. संस्थेत काम करत असताना दिवंगत प्रा. एन. डी. पाटील साहेबांसोबत रयत सेवक मित्र मंडळ स्थापना करत संघटनेत काम केले. रयत सेवक को. ऑप बँकेचे चेअरमन म्हणून काम केले. त्यानंतर आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर विद्या मंदिर शिनोली येथे बदली झाली. तेथे काम करत असताना दिवंगत कामगार नेते कै. टी. एस. बोऱ्हाडे यांच्यासोबत विशेष स्नेह जुळला. शाळेची सुधारणा करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शिनोलीनंतर स्वतःच्या दौंड तालुक्यामधील नागेश्वर विद्यालय पाटस येथे बदली झाली. विद्यार्थ्यांना शिस्त लावता लावता विद्यालयाची इमारत उभी केली. पुणे जिल्हा परिषदेने त्यांच्या कामाची दखल घेत शिक्षण राज्यमंत्री सलीम झकेरिया यांच्या हस्ते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले. अनेक गोरगरीब मुलांना रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला लावून त्यांचा प्रपंच सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल घेत संस्थेने त्यांना पश्चिम विभागाच्या सल्लागारपदी नेमले.

राजकारण व समाजकारणातील प्रवेश
सरांनी पारगावमधील कै. माजी आमदार राजारामबापू ताकवणे, कै. समाजसेवक शिवाजीकाका जेधे, कै. ज्ञानदेवतात्याबा ताकवणे, कै. एकनाथ रामभाऊ रणदिवे यांच्यासोबत गावच्या समाजकारण आणि राजकारणात भाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात सरपंचपदी निवड झाली. सरपंच झाल्यानंतर सेवा शिल्लक असूनही स्वेच्छानिवृत्ती घेत गावच्या विकासाला झोकून दिले. गावामध्ये लोकनाट्य तमाशा असताना युवक तमाश्यासमोर गोंधळ घालत असतील तर सरांनी स्टेजवर जाऊन काठी आपटली तरी एका मिनिटांमध्ये सगळीकडे शांतता पसरायची. ग्रामदैवत तुकाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना उद्योगपती विकासआबा ताकवणे यांना मोलाची साथ दिली. न्यू इंग्लिश स्कूल पारगावमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला. ते काम पूर्ण करूनच अनंतात विलीन झाले.

(शब्दांकन : प्रकाश शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT