पुणे

कोल्हापूर:अरुण लाड यांच्याकडून कृषी महाविद्यालयाला संगणक भेट

CD

अरुण लाड यांच्याकडून
कृषी महाविद्यालयाला संगणक भेट

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आमदार अरुण लाड यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून सुमारे ५ लाख रुपये किमतीचे आधुनिक संगणक महाविद्यालयाला भेट दिले.
या संगणकांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, संशोधन, डेटा विश्लेषण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अधिक सक्षम सुविधा उपलब्ध होणार आहेत. या वेळी लाड यांनी विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाच्या विकासासाठी योगदान देणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व क्रांतिअग्रणी साखर कारखान्याचे कृषि अधिकारी दिलीप पार्लेकर यांचेही योगदान राहिले. डॉ. भारत कोलगणे यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : केतनला टक्कल होते, विग लावायचा म्हणून त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं; सियाने पोलिसांना सांगितले हत्येचे खरे कारण

Pune Traffic Update : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर पडला बंद; वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा, प्रवाशांना कोंडीचा नाहक त्रास

Panvel: निरागस लेकरावर निर्दयी अत्याचार! अंगणवाडीत जाण्यास नकार; मुलीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारले, व्हिडीओ व्हायरल

स्वानंदीसाठी समर करणार वडाची पूजा, तर स्वानंदीही देणार प्रेमाची कबुली! 'वीण दोघातली...' मध्ये अखेर तो क्षण येणार

Latest Marathi News Live Update : केतनची अग्रवाल मृत्यू प्रकरण : लहान वयातील मुलांना अशी सुडबुद्धी कशी सुचते? - मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT