arun-padule 
पुणे

अरुण पाडुळे यांची राष्ट्रिय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेत  निवड

ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी - पिंपरी चिंचवड शहरातील मोरे वस्ती, चिखली येथील अरुण सुभाष पाडुळे यांची राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी चेन्नई येथे सुरू असलेल्या अठ्ठावीसाव्या जी व्ही मावळणकर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत ४०० पैकी ३६८ गुण संपादन केले. या स्पर्धेसाठी भारतातून सुमारे पाच हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. 

अरुण पाडुळे गेल्या वर्षभरापासून राहटणी मधील एक्सलन्स शुटिंग या अकादमीमध्ये  प्रशिक्षक सौरभ साळवणे व सरिता गोरे यांच्याकडे नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. एक वर्षाच्या खडतर प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करत त्यानी हे यश संपादन केले. 

गेल्या तीन महिन्यात प्रशिक्षक सौरभ साळवणे यांनी विशेष मेहनत घेतली. वेळोवेळी त्यांना खूप मदत केली. दि ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी चेन्नई येथील स्पर्धेत अरुणने घवघवीत यश संपादन करत राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली हेच अरुणकडून शिक्षक दिनाचे बक्षीस असल्याचे प्रशिक्षक सौरभ  साळवणे व सरिता गोरे यांनी सांगितले तसेच पुढील महिन्यात राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेत यापेक्षा चांगली कामगिरी करेन असा विश्वास अरुण पाडुळे  यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

CM Devendra Fadnavis: उद्योगांत महाराष्ट्र अव्वलच, 'कंपन्या बंद'चा दावा चुकीचा; फडणवीस यांचा विश्वास

आज शूटिंगचा शेवटचा दिवस... झी मराठीची मालिका अवघ्या ७ महिन्यात घेणार निरोप; मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना धक्का

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

IND vs SL 1st Test: परदेशात फडकला तिरंगा, राष्ट्रगीताने भारावलं गॉलचं मैदान; शुभमन गिलसह टीम इंडियाचा VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT