arvind gokhale and chaturanga pratishthan announced award of mrityunjay pratishthan sakal
पुणे

Pune News : अरविंद गोखले आणि चतुरंग प्रतिष्ठानला ‌‘मृत्युंजय प्रतिष्ठान’चा पुरस्कार जाहीर

यंदा पुरस्कारांचे हे सतरावे वर्ष असून सावंत यांच्या २१व्या स्मृतीदिनी (ता.१८) पुरस्कारांचे वितरण

- मीनाक्षी गुरव

पुणे : मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा ‘साहित्यविषयक पुरस्कार’ ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले यांना, तर ‘समाजकार्य पुरस्कार’ मुंबईसह कोकणात कार्यरत असलेल्या चतुरंग प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे यांनी दिली.

‌‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या सोमवारी (ता.१८) एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

यंदा पुरस्कारांचे हे सतरावे वर्ष असून सावंत यांच्या २१व्या स्मृतीदिनी (ता.१८) पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे मृणालिनी सावंत यांनी सांगितले.

शिवाजीराव सावंत यांच्या जन्मगावी उभारले जातंय सभागृह

‘‘शिवाजीराव सावंत यांच्या आजरा या जन्मगावी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत एक भव्य सभागृह उभारले जात आहे. या सभागृहाला सावंत यांचे नाव देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी जिल्हा परिषदेला सुमारे ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. सध्या सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे,’’ असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: कोट्यवधींचा तराफा फेल ठरला; ग्रहणकाळात लालबागच्या राजाचे विसर्जन होणार? भक्तांमध्ये संतापाची लाट

Pune Ganapati Visarjan: मानाच्या गणपतींनी वेळ पाळली, पण... ; ३१ तासांच्या विसर्जन मिरवणुकीवर पोलीस आयुक्त काय म्हणाले?

Ganesh Festival 2025 : पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता मुरुडमध्ये डीजेच्या तालावर विसर्जन

Anjana Krishna Video: महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल.! मिटकरींनी घेतला यु टर्न | Sakal News

Latest Maharashtra News Live Updates: तामिळनाडूत मुसळधार पाऊस! विमानतळाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली, नागरिकांचे हाल

SCROLL FOR NEXT