pune-uni.jpg 
पुणे

पुणे : पाहा पुणे विद्यापीठ परीक्षा संचालकांचा कार्यभार कोणाकडे सोपविला...

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापुढे परीक्षांचे नियोजन करण्याचे आव्हान असताना, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे कोल्हापूरमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे परीक्षा विभागाच्या निर्णय प्रतिक्रियेत येत असलेल्या अडथळ्यांमुळे या विभागाचा कारभार डाॅ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे देण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डाॅ. अरविंद शाळीग्राम हे ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकपदी डाॅ. महेश काकडे यांची निवड करण्यात आली होती. काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात परीक्षा संचालक पदावर काम केले आहे. त्यानंतर त्यांना आता पुणे विद्यापीठाची जबाबदारी स्विकारली. 

दरम्यान, महेश काकडे हे कोल्हापूर येथे गेले असताना 
'कोरोना' लाॅकडाऊन जाहीर झाले. १४ एप्रिल नंतर पुण्यात येतील अशी अपेक्षा होती. मात्र, लाॅकडाऊन वाढल्याने त्यांना अद्याप पुण्यात येता आलेले नाही. एकीकडे पुणे विद्यापीठाला अडीच लाख मुलांच्या परीक्षा एका महिन्यात घ्यायच्या असताना दुसरीकडे काकडे हे कोल्हापूरमध्ये असल्याने निर्णय घेण्यात, नियोजनात अडचणी निर्माण झाल्या. काकडे यांच्या रजा काळातील हे अडथळे दूर करण्यासाठी निवृत्तीनंतर पुणे विद्यापीठात इमेरिटस प्राध्यापक म्हणून रुजू झालेले डाॅ. शाळीग्राम यांच्याकडे परीक्षा संचालकाचा कार्यभार देण्यात आला आहे. कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांनी कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांच्या आदेशानुसार याबाबत परिपत्रक काढले आहे. 

मुख्यालय सोडलेल्यांनी परत या...
लाॅकडाऊन काळात जे कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडून गेले आहेत, त्यांच्यामुळे कामावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे लाॅकडाऊन किंवा संचारबंदीत मुख्यालय सोडून इतर  ठिकाणी असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांनी १७ मे पर्यंत परत यावे आणि कामावर रूजू झाल्याचा इमेल करावा, असे आदेश कुलसचिव पवार यांनी काढले आहेत. दरम्यान, परीक्षा मंडळाचा कार्यभार डाॅ. शाळीग्राम यांच्याकडे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT