MDH26B05153
मानेगाव (ता. माढा) : येथील कृषी महाविद्यालयातील कृषी उपकरणांची पाहणी करताना बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी.
---
बारामती कृषी कॉलेजच्या
विद्यार्थिनी माढ्यात दाखल
आर्या कृषी महाविद्यालयात संस्थात्मक अभ्यास
सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. २४ : मानेगाव (ता. माढा) येथील आर्या कृषी महाविद्यालयात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत संस्थात्मक अभ्यासासाठी बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी दाखल झाल्या आहेत. कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थिनींसाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा घटक मानला जातो.
या भेटीदरम्यान विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील विविध विभाग, प्रयोगशाळा व शेती प्रक्षेत्राला भेट देत शैक्षणिक सुविधा आणि संशोधन कार्याची माहिती घेतली. कौशल्यवृद्धी अभ्यासक्रमांतर्गत दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उपक्रम तसेच रब्बी पीक संग्रहालयाची पाहणी करून सुधारित वाणांचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले.
प्रा. तुषार नामदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेततळ्याला क्षेत्रभेट देत जलसंधारण व पाणी व्यवस्थापनाच्या तांत्रिक बाबी समजावून सांगण्यात आल्या. प्रा. संदीप मुरूमकर यांनी कृषी शिक्षणातील संधी, व्यावसायिक शेतीचे विविध पैलू आणि शेतीपूरक उद्योगांविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. नितीन उबाळे यांनी महाविद्यालयाची रचना, शैक्षणिक कार्यपद्धती, उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील संधी याविषयी माहिती दिली.
या शैक्षणिक भेटीत प्रतीक्षा भारती, साक्षी सोनवळकर, पूजा सूर्यवंशी, तन्वी देशमुख, प्रगती कुलकर्णी, मायावती चोरमले व संजीवनी गुंड सहभागी झाल्या. डॉ. तृप्ती राठोड यांनी उपक्रमाचे समन्वयन केले. याप्रसंगी प्रा. तुषार नामदे, प्रा. स्नेहल साठे, प्रा. खंडेराव वाघे, प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रा. अमोल माळी, प्रा. ज्ञानेश्वरी झोळ, प्रा. हनुमंत निगुडे तसेच प्रा. अक्षय शेळके उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.