पुणे

ढिंग टांग

CD

ढिंग टांग२४०६२६

शोक-पस्तावावर खुलासा..!
- ब्रिटिश नंदी

सवर्गीय (स्वर्गीय असे वाचावे) आशाताई दिनकर मंगेशकर (च्यामारी पुन्यांदा नाव चुकले. दिनानाथ किंवा दीनानाथ...काहीही चालेल, पण वाचावे!) यांना श्रधधांजली (जोडाक्षरे ज्याने शोधून काढली, त्याला जोड्याने मारावा.) जो शोकपस्ताव (प्रस्ताव) मांडण्यात आला, तो अतिशय बारीक टायपात होता. आणि फोटोकापी मशीनमधली शाई संपल्याने तो असपष्ट (अस्पष्ट) होता. तरीही तो आम्ही वाचून काढला. वाचून काढल्यानंतर आम्ही कागदच उलटा धरून वाचल्याचे ध्यानात आले! पण तोवर उशीर झाला होता. मुळात आमच्या हातात घाणेरडी छपाई असलेला सदोष मराठी मजकूर लिहिलेला कागद ज्याने दिला, त्याच्याविरोधात अविश्वास दर्शक ठराव आणला पाहिजे. (आणा, आणा!) मजकूर वाईट, टाइप वाईट, छपाई वाईट, कागद वाईट...सगळेच वाईट असून त्यामानाने आम्ही उत्तम अभिवाचन केले, असे म्हणावे लागेल.
माझ्या अभिवाचनामुळे बऱ्याच कुलुंगी टीकाकारांनी मायमराठीच्या नावाने गळे काढले. कुत्री अभद्र भुंकली. पण मी अभिजात मराठीचा पाईप आहे. (पाईक असे वाचावे.) माझे मराठी भाषेवर अतोनात म्हंजे अतोनात फ्रेम आहे. मराठीतले सातबारे आणि फेरफाराचे दस्त मी सहज वाचू शकतो. अगदी कोऱ्या कागदावरचे फेरफारसुद्धा नीट वाचू शकतो. पण हाय मराठी असली की कुणीही फाफलणारच. तरीही मी चांगले अभिवाचन केले. अभिवाचनाची मला लहानपणापासून सवय आहे. मी इतका घडाघडा बोलत-वाचत असे की शेजाऱ्यांनी मला ‘लेका बालिष्टर का झाला नाहीस?’ असे म्हटले. मग मी वकील झालो.
खरे सांगायचे तर माझे अभिवाचन अलवाकिक दर्जाचे (अलौकिक असे वाचावे.) होते. लोकांना ते समजले नाही कारण हल्ली मराठी भाषेचा स्तरच खाली जात आहे. स्व. आशाताईंचा मानभंग होईल, असे तर माझ्या सपनातही येणार नाही. (स्वप्न...पुन्हा जोडाक्षरं!) मराठी गानरसिकांचे कान तृप्त करणारी आशाताईंची गाणी अरं जा मर अशी आहेत. (कृपया अजरामर असे वाचावे.) गानरसिकांच्या तृप्तीबद्दलचे वाक्य मी अंदाजानेच वाचले, इतके असपष्ट होते. ‘गान’ या शब्दावर तर मी खूपच अडखळलो. नशीब, मी योग्य पद्धतीनेच अभिवाचन केले. या शोकपस्तावाच्या अभिवाचनानंतर मला उपस्थितांनी चांगली दाद दिली. म्हणाले की, ‘‘अध्यक्षमहोदय, तुम्ही उत्तम वाचन करता. कार्यक्रम का करीत नाही? तुफान लोकप्रिय होतील!’’
ही सूचना मी मनावर घेतली. पण त्यानंतर काही टीकाकारांनी माझ्या अभिवाचनावर यथेच्छ झोड उठवली. यामागे हितचिंतकांचे राजकारण आहे हे मला समजते. इतके काही माझे मराठी वाईट नाही. गेली साडेचार वर्षे मी या खुर्चीत बसून माझ्या माहितीप्रमाणे मराठीतूनच सभागृहाचा कारभार चालवत आहे. ज्याअर्थी सगळे खुश आहेत, त्याअर्थी माझी भाषाही चांगलीच आहे. आत्ताच कशी ही टीका झाली?
जे घडले त्यात माझा काहीही दोष नव्हता. कागद, टाइप, छपाई वगैरेबद्दल मी सुरवातीला सांगितलेच. तरीही मी चांगलेच वाचन केले. काही राजकीय नेते कागद हातात न घेता किती वाईट भाषा वापरतात, हे कुणी पाहिले का? कागदावर वाचून मी असे वाचन केले, हातात कागद नसता तर काय बोललो असतो याची कल्पना करा. त्यापेक्षा आहे ते काय वाईट आहे?
तरीही कुणाचे मन दुखले असेल तर मी सॉरी म्हणतो. अगदी शुद्ध मराठीत सॉरी! मग तर झाले? एवढ्या खुलाश्यानंतर कुणी माझ्याकडे बारीक टायपातली लक्षवेधी सूचना आणून दिली, तर मग मला जबाबदार धरू नका.
यापुढे माझ्यासमोर येणारा प्रत्येक मजकूर हा मोठ्या टायपातला, स्वच्छ छपाई असलेलाच आला पाहिजे. जय महाराष्ट्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update: कचनेर तांड्यात गांजाची शेती उघडकीस; २४१ झाडे जप्त

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

SCROLL FOR NEXT