asha_buchke 
पुणे

जुन्नरच्या सभापती निवडीसाठी यांच्या भूमिकेला महत्त्व 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुका पंचायत समितीचे सभापतिपद दुसऱ्यांदा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. पंचायत समितीतील पक्षीय बलाबल पाहता जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या भूमिकेस महत्त्व आले आहे.

 जुन्नर पंचायत समितीचे सभापतिपद मागील दोन सोडतींत सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते; तर सन 1998- 99 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी, त्यानंतर सन 2012 ते 14 साठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होते. सुमारे पंधरा वर्षांपासून अनुसूचित जमाती व सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षण निघाले नाही. त्यामुळे या वेळी या दोन वर्गापैकी एकास संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, पुन्हा मागास प्रवर्गासाठी आरक्षण निघाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

जुन्नर पंचायत समितीत शिवसेनेचे सात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा व कॉंग्रेस एक, असे संख्याबळ आहे. नवीन आरक्षणानुसार "राष्ट्रवादी'चे विशाल तांबे, नंदा बनकर; तर शिवसेनेच्या जीवन शिंदे व अर्चना माळवदकर यांना संधी मिळू शकते. विधानसभा निवडणुकीत शिंदे व माळवदकर यांनी शिवसेनेच्या बंडखोर आशा बुचके यांना साथ दिली होती. त्यामुळे सभापतिपदासाठी बुचके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मागील वेळी कॉंग्रेसला उपसभापतिपद देऊन शिवसेनेने पंचायत समिती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते. 

दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे या वेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना एकत्रितपणे सभापतिपदाचा उमेदवार देणार कास हादेखील प्रश्‍न आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. तालुक्‍याचे लोकप्रतिनिधित्व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आले असल्याने पंचायत समितीची सत्ता आपल्या पक्षाकडे राहावी, अशी आमदार अतुल बेनके यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT