आशाभवनमध्ये
शिक्षक सन्मान
सातारा, ता. ५ : येथील आशाभवन मतिमंद मुलांच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेतील विशेष मुलांच्या पालकांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करत त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला. यावेळी विशेष मुलांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या शिक्षकांचे कौतुकही अनेक पालकांनी केले. या कार्यक्रमास पालकांसह इतर मान्यवर मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित होते.
.............
निबंध स्पर्धेचे आयोजन
सातारा, ता. ५ : कृष्णाय प्रकाशन व दत्तसंस्थान भक्त परिवाराच्या संयुक्त विद्यमाने सातारा तालुक्यातील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षक आणि पुस्तक शालेय जीवनाचा आत्मा’ तसेच ‘पुस्तक वाचन संस्कृती ः शाप की वरदान’ या दोन विषयांवर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन वि. म. काळे आणि लेखक सुनील पाटणे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. स्पर्धेतून तीन विजेत्यांची निवड करत त्यांना सन्मान करण्यात येणार असून, उत्तेजनार्थ देखील पारितोषिक देण्यात येणार आहे.
.........
जगन्नाथ शिंदे यांच्या
कादंबऱ्यांचे प्रकाशन
सातारा, ता. ५ : येथील ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे यांच्या कमांडो, तीर्थरूप महाराज या कादंबऱ्यांच्या पहिल्या आवृत्तीचे तसेच भूमिपुत्रांचा लढा या कादंबरीच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच प्रकाशन झाले.
हा सोहळा हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी सणस, ज्ञानदीपचे माजी संचालक दुष्यंतराव जगदाळे, सावरकर विचार मंचचे सुनील घोलप, पाणी फाउंडेशनचे सुनील मोरे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
जगन्नाथ शिंदे हे साहित्य विश्वातील अलौकिक व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी आजवर १८२ नाटके, पुस्तके, कांदबऱ्या, कथासंग्रह लिहिली आहेत. त्यांच्या साहित्यास वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक कादंबऱ्या व पुस्तकांचे पुनर्मुद्रित आवृत्त्या प्रकाशित कराव्या लागल्या आहेत. त्यांच्या साहित्याचे समाजमाध्यमांवर देखील वाचन होत असून, अनेक पुस्तके शासन यादीत समाविष्ट आहेत. त्यांचे लेखन वाचकांना विचार करण्यास भाग पाडत असल्याचे मत दत्ताजी सणस यांनी यावेळी नोंदवले.
माझी प्रत्येक साहित्यकृती वेगळी असते. प्रत्येकाचा विषय आणि आशय नवीन असतो. त्यामुळे वाचकांना ती आवडतात. कथा, कादंबरी, नाटक लिहिण्यापूर्वी स्थळ, घटना, व्यक्ती आणि कथानकाचा सखोल अभ्यास मी करतो. यामुळे माझ्या साहित्यकृतींना वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्रकाशन सोहळ्यानिमित्त जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.
.........
39801
सातारा : प्रकाशनावेळी जगन्नाथ शिंदे, दत्ताजी सणस, दुष्यंतराव जगदाळे, सुनील घोलप आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.