पुणे

Ashadhi Wari 2023: पालखी सोहळ्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट! मोबाईल चोरांना रंगेहात अटक

शहरात सोमवारी पालख्यांचे होत आहे. पालखी सोहळ्यात भाविकांकडील मोबाईल आणि दागिने चोरीच्या घटना घडतात.

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 - पालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाईल चोरण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

श्रीकांत राजू जाधव (वय २१) आणि दिलीप बलभीम गायकवाड (वय ३३, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरात सोमवारी पालख्यांचे होत आहे. पालखी सोहळ्यात भाविकांकडील मोबाईल आणि दागिने चोरीच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर दोघेजण मोबाईल चोरीच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली.

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने हडपसरमधील रविदर्शन परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. हे दोघे सराईत चोरटे असून, त्यांनी हडपसर, मुंढवा, बंडगार्डन, बिबवेवाडी परिसरातून मोबाईल चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपी जाधव याच्याविरुद्ध घरफोडी आणि मोबाईल चोरीचे २४ गुन्हे दाखल आहेत. चोरी केल्यानंतर मोबाईल कर्नाटकात विक्रीसाठी पाठविणार असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT