Ashadhi Wari sakal
पुणे

Ashadhi Wari : पुण्यनगरी न्हाऊन निघाली भक्तिरसात;‘पादुकांचे दर्शन आनंदाचा क्षण’

पालखी सोहळा मुक्कामामुळे सोमवारी पुण्यनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका दर्शनासाठी अलोट गर्दी लोटली होती. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकरांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पालखी सोहळा मुक्कामामुळे सोमवारी पुण्यनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका दर्शनासाठी अलोट गर्दी लोटली होती. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकरांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेणे हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. तोच आनंद अनुभवण्यासाठी मी पुण्यात आलो. महाराष्ट्रातील हा पालखी सोहळा आणि वारी खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा दिला आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

आषाढी वारीसाठी आळंदीतून निघालेली संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि देहूतून निघालेली संत तुकाराम महाराज यांची पालखी सोमवारी पुण्यात मुक्कामी होत्या. तिचे दर्शन घेण्यासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून वारी सुरू आहे. जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहे, तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच फडकत राहील आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा अखंडित राहील असा मला विश्वास आहे. आज दोन्ही संतांच्या पादुकांचे दर्शन घेता आले याचा आनंद आहे’’.

आरोग्य तपासणी, गोळ्यांचे वाटप

पुणे : वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व गोळ्या वाटप करण्यात आले. डॉ. मोनिका काटे-पानसरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात १५०० जणांची तपासणी केली. हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय वाकडेवाडी येथे आयोजित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT