Hindu Muslim Relations sakal
पुणे

Ashadhi Wari : हिंदू-मुस्लिम एकोप्याचे वारीमुळे घडले दर्शन

नवभारत सेवा मंडळातर्फे मुस्लीम बांधवांनी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करीत हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडवले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

भेदाभेद भ्रम अमंगळ।।

कोणाही जिवाचा न घडो मत्सर

वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।

जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळींचा प्रत्यय आज भवानी पेठेत आला. येथील नवभारत सेवा मंडळातर्फे मुस्लीम बांधवांनी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करीत हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडवले. पालख्यांचे सोमवारी (ता. १२) शहरात आगमन झाल्यापासूनच मंडळातर्फे वारकऱ्यांच्या सेवेला सुरुवात झाली.

सोमवारी रात्री भोजन, मंगळवारी (ता. १३) सकाळी नाश्‍ता, दुपारचे भोजन व रात्रीचे भोजन अशी सर्व सोय मंडळातर्फे करण्यात आली. त्याचप्रमाणे वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर पण आयोजित करण्यात आले होते. सुमारे पंधराशे वारकऱ्यांनी एकवेळच्या भोजनाचा लाभ घेतला.

याबाबत मंडळाचे रशीद शेख म्हणाले, ‘गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मुस्लीम बांधवांतर्फे वारकऱ्यांची सेवा केली जाते. शहरात धार्मिक सलोख्याचे वातावरण राहावे, हिंदू-मुस्लिम एकोपा टिकून राहावा हा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वारीत सहभागी होणारे वारकरी एवढ्या मोठ्या अंतरावरून चालत येतात. यापुढेही त्यांना मोठा पल्ला पार करायचा असतो. त्यांची सेवा करणे हे आमचे कर्तव्यच आहे, अशी आमची भावना आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी लांबणीवर, राज्यपालांच्या भेटीत काय घडलं?

Thane: ठाणे जिल्ह्यात पाणीकपातीच संकट, 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद; हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे पालिकेचा निर्णय

Nagpur Tehsildar Attack : नागपुरात तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं अन्... "कायदा आता माफियांच्या दादागिरीने चालतोय का?" वडेट्टीवारांचा सवाल

Bank Closed: सलग 4 दिवस बँका बंद राहणार? SBI बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला देशव्यापी संप!

Alandi Palakhi: आळंदी देवस्थान आक्रमक भूमिकेत; पुणे मुक्कामाबाबत अंतिम निर्णय १३ मे नंतर, प्रशासन-देवस्थान समन्वयानंतर वेळापत्रक जाहीर होणार!

SCROLL FOR NEXT