Muktabai Naik Sakal
पुणे

Ashadhi Wari : ८५ वर्षाच्या आईला व्हीलचेअरवरून वारी घडविणारा पुत्र

वयाच्या ८५ व्या वर्षी मुक्ताबाई नाईक यांनी मुलाकडे वारीचा व्यापक सोहळा पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

समाधान काटे

वयाच्या ८५ व्या वर्षी मुक्ताबाई नाईक यांनी मुलाकडे वारीचा व्यापक सोहळा पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

शिवाजीनगर - बरे झाले आजिवरी । नाही पडलो मृत्यूचे आहारी । वांचोन आलो एथवरी । उरले ते हरी तुम्हां समर्पण ।। या उक्तीप्रमाणे वयाच्या ८५ व्या वर्षी मुक्ताबाई नाईक यांनी मुलाकडे वारीचा व्यापक सोहळा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. वारकरी संप्रदायाचे विचार अमलात आणणारा सुपुत्र ज्ञानोबा नाईक यांनी शक्कल लढवली,आणि आपल्या आई (माऊलीच्या) इच्छा पूर्ण करण्यासाठी व्हीलचेअर हातात घेतली. देहू ते पुणे हा पहिला व्हीलचेअर वारी मुक्काम यशस्वी झाल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

माऊलींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचा विश्वासचा ज्ञानोबा यांच्या बोलण्यात होता. त्यामुळे पंढरपूरला निसंकोच आईला घेऊन पोहोचू असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

गोदावरी काठी असलेले रामपुरी बुद्रुक हे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेलं गाव. या गावातील अनेक वारकरी शेकडो वर्षापासून पंढरीला जातात. येथील मुक्ताबाई नाईक या लहानपणापासून पंढरपूरला वारीला जात होत्या. पतीचे निधन झाल्यानंतरही त्या एकट्या वारीला जात असत. पण सध्या वय झाल्यामुळे एकटीने पायी वारी करणं शक्य नव्हतं. घरी असलं तरी वारीचे चिंतन असायचं. याची देही, याची डोळा! पाहू सुखाचा सोहळा!! या उक्तीप्रमाणे आपण वारीला जावं असं मुक्ताबाईंना मनापासून वाटायचं. आईच्या इच्छेखातर मुलाने व्हीलचेअर चा पर्याय निवडला आणि सुरू झाला वारीचा प्रवास.

खरा वारीचा आनंद सगळ्यांच्या मेळ्यात मिळतो. संपर्कात येणे प्रत्येक दिंडीला भेट देणे.आळंदी ते पुणे या प्रवासात साधुसंतांचे दर्शन झाले. संस्कृतीला जोपासणारी, मायाळू पुण्यासारखी माणसं पूर्ण भारत वर्षात भेटणार नाहीत. पुणेकरांचे प्रेम पाहून भारावून गेलो. आईला घेऊन व्हीलचेअर ढकलत असताना,ज्याप्रमाणे मंत्री येत असताना समोर रस्ता मोकळा केला जातो. त्याप्रमाणे मला देखील एक- दोन किलोमीटर रस्ता मोकळा केला जात होता.

सांस्कृतिक वारसा जपणारे पुणे शहर, या ठिकाणी आल्यावर आमचे फोटो, व्हिडिओ काढणे, आशीर्वाद घेणे, सन्मानाने वागणूक देणे या सर्व गोष्टींमुळे मी भारावून गेलो.आई-वडिलांची सेवा म्हणजेच खरी वारी.

- ज्ञानोबा सोपानराव नाईक वारकरी, मुक्ताबाई यांचे पुत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT