Devendra Fadnavis esakal
पुणे

Devendra Fadnavis: पालखी सोहळा खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताचा आध्यात्मिक अन् सांस्कृतिक ठेवा ; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना

Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी आळंदीतून निघालेली संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि देहूतून निघालेली संत तुकाराम महाराज यांची पालखी आज पुण्यात मुक्कामी आहे. तिचे दर्शन घेण्यासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेणे हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. तोच आनंद अनुभवण्यासाठी मी आज (ता. १) पुण्यात आलो. महाराष्ट्रातील हा पालखी सोहळा आणि वारी खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा दिला आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

आषाढी वारीसाठी आळंदीतून निघालेली संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि देहूतून निघालेली संत तुकाराम महाराज यांची पालखी आज पुण्यात मुक्कामी आहे. तिचे दर्शन घेण्यासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, ‘‘ गेल्या अनेक वर्षांपासून वारी सुरू आहे. जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहे, तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा अखंडित राहील असा मला विश्वास आहे. आज दोन्ही संतांच्या पादुकांचे दर्शन घेता आले याचा आनंद आहे.

राहुल गांधी यांचा निषेध-

लोकसभेतील विरोधीपक्षनेते ⁠राहुल गांधी यांनी हिंदूंविषयी केलेल्या विधानाचा मी निषेध करतो. या निंदणीय वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी. दरम्यान, विधान परिषदेत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे व भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या जोरदार वादावादी झाली. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर विधान परिषदेत काय गोंधळ झाला याची मला माहिती नाही. याची माहिती घेऊन त्यावर बोलेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मेट्रो लाईन ४ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होणार, कुठून कुठे असणार?

Solapur Agriculture : विहीर योजनेत सरकारचा दुटप्पीपणा,सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना विहिरीचा थेट लाभ द्या!

Kashmir Encounter: मोठी बातमी! भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोघांचा खात्मा, कुठे घडली घटना?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार

Rupali Chakankar: चाकणकर-ठोंबरेंमध्ये वाद का पेटला? पक्षाने धाडलेल्या नोटिशीत नेमकं काय?

SCROLL FOR NEXT