Ashadhi Wari shapat sakal
पुणे

Ashadhi Wari : पंढरीची आस...पर्यावरणाचा ध्यास

‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘साथ चल’ उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाची शपथ

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari - सोमवारची रम्य पहाट..., आल्हाददायक हवा..., टाळ-मृदंगाचा सुमधूर निनाद..., कानी पडणारे ध्वनिक्षेपकावरील भक्ती गीतांचे स्वर... अशा वातावरणात पताका नाचवत आणि ‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’ जयघोष करीत वैष्णव चालत आले... दिंड्या पुढे-पुढे सरकू लागल्या... पाठोपाठ संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष आले... त्यांच्या उपस्थितीत सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

त्यानंतर पर्यावरण दिंडी हळू हळू पुढे चालू लागली. निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित आणि ‘फिनोलेक्स केबल्स’ प्रायोजित ‘साथ चल’ उपक्रमाचे.

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून पंढरपूरकडे निघाला आहे. सोहळ्याचा वाटचालीतील पहिला मुक्काम आकुर्डीत झाला. सोमवारी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. त्यावेळी पिंपरीत ‘सकाळ’ने ‘साथ चल’ उपक्रम राबविला. त्याअंतर्गत ‘वारी विठुरायाची, पर्यावरण संवर्धनाची’ संदेश देत दिंडी काढली.

या वाटचालीत अहिल्यादेवी होळकर चौकात अर्थात मोरवाडी चौकात पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. त्यानंतर एचए कंपनी कर्मचारी वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळील भुयारी मार्गापर्यंत दिंडी निघाली. तिथेही शपथ घेतली. संत तुकाराम महाराज यांनी ‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे।’ या अभंगातून निसर्ग व पर्यावरणाचे महत्त्‍व सांगितले आहे. हाच धाका पकडून प्रदूषण मुक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

मोरवाडी चौकात देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, फिनोलेक्स केबल्सचे अध्यक्ष अमित माथूर, कीर्तनकार बब्रुवान महाराज वाघ, फिनोलेक्स कामगार संघटनेचे विश्वनाथ शिंदे, शरद कुंभार, डॉ. एम. एन. गुप्ता आदी उपस्थित होते. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, चिफ मार्केटिंग ऑफिसर नवल तोष्णीवाल, सरव्यवस्थापक रुपेश मुतालिक यांनी सर्वांचे स्वागत केले.

पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. त्यानंतर ‘साथ चल’ दिंडी एचए कंपनीपर्यंत पोहोचली. तिथे पुन्हा शपथ घेतली. त्यानंतर वांगी संस्थान (बीड) येथील भागवत महाराज चव्हाण यांनी पखवाज वादन केले.

तत्पुर्वी संपादक फडणीस यांनी वारीचा उद्देश सांगितला. ‘सकाळ’ने पर्यावरण संवर्धन उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत यंदा राज्यातील वेगवेगळ्या भागात ५० हजार झाडे लावली जाणार आहेत. प्रत्येकाने एक झाड लावले तरी, पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असेही त्यांनी सांगितले. पसायदानाने दिंडाचा समारोप झाला.

‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘साथ चल’ उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. संतांच्या वचनांप्रमाणे ही वाटचाल आहे. संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा ‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरी’ म्हणत पर्यावरणाचे महत्त्व अभंगातून सांगितले आहे.

सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी आहे, म्हणून जीव सृष्टी आहे. ती अबाधित राहण्यासाठी पृथ्वीला प्रदुषणमुक्त करून पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. ‘सकाळ’ने त्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेले आहे. त्यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.

- पुरुषोत्तम महाराज मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू

आई-वडिलांच्या सेवेसाठी वारीला चला, असा संदेश ‘साथ चल’ दिंडूतून यापूर्वी दिला होता. यावर्षी पर्यावरणाचा संदेश दिला जात आहे. संत तुकाराम महाराज यांनीसुद्धा पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. झाडांचं संगोपन मुलांसारखं केलं तर, तीच झाडं पुढे तुम्हाला मुलांसारखं प्रेम देतील, सांभाळतील.

आम्ही टेक्नॉलॉजीमुळे इतके अंध झालो आहोत की, पर्यावरणाचा विसर पडला आहे. झाडे लावा, त्यांचं संगोपन करा. त्यांचं सवर्धन करा. हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण होणार नाहीत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात करावी.

- अमित माथूर, अध्यक्ष, फिनोलेक्स केबल्स, पिंपरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT