Ashadhi Wari Sakal
पुणे

Ashadhi Wari : पंढरीची वारी आहे माझ्या घरी! ३५ वर्षांपासून दापोडीतील दोन मैत्रिणींची एकत्र पायीवारी

दापोडी येथील चंद्रभागा सोपान भाडळे वय ७५ वर्षे यांचा १९४७ साली आकुर्डी येथील साकुरे कुटुंबात जन्म झाला. लग्न झाल्यानंतर दापोडी येथे त्या स्थायिक झाल्या.

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari - १३ मैत्री आणि भक्तीचा संगम साधत मैत्री सोबत भक्तीरसाने जोडलेले मैत्रीचे नाते अध्यात्मात्मात घट्ट होत गेले.दापोडी येथील दोन मैत्रिणी एकीचे वय ७५ वर्षे तर दुस-या माऊलीचे वय वर्षे ८० दोघीही गेली ३५ वर्षांपासून दापोडी ते पंढरपूर पायी वारी करतात. भक्ती अध्यात्माच्या धाग्यात गुंफलेल्या या मैत्रीचे परिसरातून कौतुक होत आहे.

दापोडी येथील चंद्रभागा सोपान भाडळे वय ७५ वर्षे यांचा १९४७ साली आकुर्डी येथील साकुरे कुटुंबात जन्म झाला. लग्न झाल्यानंतर दापोडी येथे त्या स्थायिक झाल्या. दापोडीत त्यांना भजन व आध्यात्मिक कार्यक्रमांमधून मैत्रीण श्रीमती सावित्रीबाई मोरे यांचा सहवास लाभला. आणी भजन अध्यात्मातील ही मैत्री गेली पस्तीस वर्षांपासून पायी वारी करू लागली.

आजपर्यंत दोघी मैत्रीणी गेली ३५ वर्षे संत तुकाराम महाराज पालखीसोबत पायी वारी करीत आहेत. श्रीमती सावित्रीबाई मोरे वय ८० वर्ष व सौ. चंद्रभागा भाडळे वय ७५ वर्षे यांनी चाळीस वर्षे मैत्री भक्ती रसात जपली आहे. भाडाळे व मोरे यांचा पूर्ण परिवार वारकरी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सेवा करत आहे.दापोडी मध्ये दोन्ही मैत्रींनींचे कौतुक होत आहे. तर नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.

वारीच्या पंधरा दिवस आधीपासूनच या दोन्ही आजी पंढरपूरला पायी जाण्याच्या तयारीला लागतात. वय झाले असले तरी विठ्ठला प्रतीची ओढ आम्हाला स्वस्थ ठेवून स्वस्थ बसू देत नाही.पांडुरंगचं आम्हाला ऊर्जा देतो.पाय चालत राहाणारे.मन पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गुंतलेले असते.करता करविता तोच म्हणून घडत राहाते असे या दोघी आजी मैत्रिणींनी सांगितले.

एकदा तरी करावी पायी वारीचा संदेश देत वारीमध्ये मनुष्य जन्म सार्थकी लावण्याचे भाग्य प्राप्त होते. पंढरपूरात गेल्यानंतर पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर स्वर्गाचा अनुभव प्राप्त झाल्यासारखे वाटते म्हणून संत म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छीताती पाहे! मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा!! वारीचा सुखसोहळा हा स्वर्गातही नाही. म्हणून मनुष्य जन्म झाल्याचे समाधान लागते. माझे जीवाची आवडी! पंढरपुरा नेईन गुडी!! पांडुरंगी मन रंगले! गोविंदाचे गुणी वेधिले!!असे मनोगत दोघी मैत्रिणींनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT