Pramodbhai Pathan sakal
पुणे

Motivation News : पठाण कुटुंबाची ४८ वर्षांपासून पांडुरंगसेवा; कुटुंबाने जोपासली पंढरीच्या पायी वारीची परंपरा

संगम (ता. दौंड) येथील पांडुरंगाचरणी कुरुळी (ता. शिरूर) येथील पठाण कुटुंब गेली ४८ वर्षे पांडुरंगाची सेवा करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खुटबाव - संगम (ता. दौंड) येथील पांडुरंगाचरणी कुरुळी (ता. शिरूर) येथील पठाण कुटुंब गेली ४८ वर्षे पांडुरंगाची सेवा करत आहे. या कुटुंबाची संगम येथील संतराज महाराज देवस्थानवर व‌ पांडुरंगावर अपार श्रद्धा असून, सन १९७६पासून आजतागायत या कुटुंबाने पंढरीच्या पायी वारीची परंपरा जोपासली आहे.

संगम येथील पांडुरंगाचे मंदिर जीर्णोद्धारासाठी या कुटुंबातील दिवंगत मुबारकभाई दाऊदभाई पठाण यांनी सन १९९३ मध्ये १ लाख रुपये वर्गणी दिली होती. त्यांनी सलग २१ वर्षे आषाढी वारीसाठी चोपदार म्हणून काम केले होते. वारीमध्ये पायी चालत हातामध्ये राजदंड घेत वारकऱ्यांना शिस्त लावण्यामध्ये त्यांचा शिरस्ता असायचा. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा प्रमोद मुबारकभाई पठाण यांनी पंढरीच्या वारीची परंपरा आजतागायत जोपासली आहे.

मुबारकभाई पठाण यांनी आपल्या मुलाने हिंदू धर्माचे सर्व सण, उत्सव साजरे करावेत म्हणून त्याचे नाव प्रमोद ठेवले. प्रमोद पठाण हे संतराज महाराज संस्थांनचे विश्वस्त असून, संस्थांनच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. प्रमोद यांच्या कुटुंबाचा आषाढी वारीसाठी वेळापूर येथे असणाऱ्या अन्नदानासाठी कुरुळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंक्तीमध्ये आर्थिक व शारीरिक सहभाग असतो.

विश्वस्त असले तरी प्रमोद पठाण वारीमध्ये पडेल ते काम करतात. यामध्ये स्वयंपाकासाठी भाजीपाला आणणे, वारकऱ्यांना वाढप्याचे काम करणे, वारकऱ्यांची सेवा करणे यांचा समावेश होतो. तसेच, संगम येथील अखंड हरिनाम सप्ताहाची पंगत व महाशिवरात्रीचा फराळ यामध्ये योगदान असते.

आळंदी येथील शांतीनाथ महाराजांच्या मठामध्ये प्रतिवर्षी पठाण कुटुंबीयांच्या वतीने अन्नदान असते. तसेच, संतराज महाराज संस्थान येथे एखादा वारकरी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यातील उपचारासाठी आवश्यक त्यावेळी वाहनाची व्यवस्था या कुटुंबाच्या वतीने दिली जाते. विशेष म्हणजे सर्व हिंदू व मुस्लिम सण उत्सव, तसेच गावची यात्रा या कुटुंबामध्ये साजरी केली जाते. गावामध्ये व परिसरामध्ये जातीय सलोखा व भाईचारा जोपासण्याचे काम पठाण कुटुंबीय करीत आहे.

पहिले मुस्लिम चोपदार

पायजमा कुर्ता व डोक्यावरती लाल टोपी असणारे मुबारकभाई पठाण हे वर्षभर संगम येथे धार्मिक कार्यक्रमात असायचे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजातील पहिले पालखी चोपदार म्हणून ते प्रसिद्ध होते. आपल्या राजदंडाच्या इशाऱ्यावर त्यांनी कित्येकदा पालखी सोहळा सुखकर केल्याच्या आठवणी अनेक वारकरी सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT