Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Sakal
पुणे

Ashadhi Wari : पुणे मुक्कामी विसावण्यास दोन्ही पालख्यांना मोठा विलंब

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्यांना बुधवारी (ता.२२) पुणे मुक्कामी विसावण्यास नेहमीच्या तुलनेत मोठा विलंब झाला.

सकाळ वृत्तसेवा

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्यांना बुधवारी (ता.२२) पुणे मुक्कामी विसावण्यास नेहमीच्या तुलनेत मोठा विलंब झाला.

पुणे - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्यांना बुधवारी (ता.२२) पुणे मुक्कामी विसावण्यास नेहमीच्या तुलनेत मोठा विलंब झाला. या दोन्ही पालखी रात्री उशिरा मुक्कामाच्या ठिकाणी विसावल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी सुमारे एक तास तर, संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी सुमारे दोन तासांच्या विलंबानंतर पुणे येथील आपापल्या विसाव्याच्या ठिकाणी पोचली.

संत तुकाराम महाराजांची पालखी रात्री ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास पुण्यातील टिळक चौकात (अलका टॉकीज चौक), तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी रात्री ९ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास टिळक चौकात पोचली. या चौकातून लक्ष्मी रस्त्याने या पालख्या आपापल्या विसाव्याच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाले. भाविकांची अलोट गर्दी, ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात या पालख्या मार्गस्थ होत होत्या. पुणेकरांनी ठिकठिकाणी विशेषतः चौका-चौकांत या पालख्यांचे स्वागत केले.

कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून पालखी सोहळा झाला नव्हता. परंतु त्याआधीच्या वर्षापर्यंत या दोन्ही पालख्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास टिळक चौकातून आपापल्या विसाव्याच्या ठिकाणांकडे मार्गस्थ होत असत. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तर, संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला आहे. या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असणार आहे. या पालख्या येत्या शुक्रवारी पहाटे पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

असं काही बोलणं झालंच नाही! ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, घाबरलेल्या अमेरिकेचा वेळकाढूपणा

कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना, ११० सैनिकांचा मृत्यू; घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर

खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Air Pollution : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची हवा बिघडतेय! शुद्ध हवेचे दिवस तीन महिन्यांत केवळ १५

SCROLL FOR NEXT