Sant Tukaram Maharaj Palkhi was welcomed in a traditional manner at Katewadi 
पुणे

Ashadhi wari : धोतराच्या पायघड्याने सजली वाट

काटेवाडीतील मेंढ्यांच्या रिंगणाने फुलले भक्तीचे मळे

राजेंद्रकृष्ण कापसे

सणसर - संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडीच्या अंगणी परीट बांधवांनी धोतराच्या पायघड्या घालून पारंपरिक पद्धतीने केलेले स्वागत... त्यानंतर रंगलेले मेंढ्यांचे रिंगण... भवानीनगरला खेळात दंग झालेला सोहळा सणसरला विसावला.

बारामतीत पालखीचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. कीर्तन, जागरानंतर शेजारतीच्या वेळी ‘तुकाराम- तुकाराम’ नामाचा जप सुरू असताना परिसरातील वातावरण खूपच प्रसन्न झाले होते. पहाटे बारामतीकरांच्या वतीने अभिषेक झाला. सकाळी सोहळा सणसरकडे मार्गस्थ झाला. बारामती ते पिंपळी रस्ता रुंद आहे. आणखी रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्याचे खडीकरण झालेले आहे. लिमटेकपासून पुढे रुंदीकरण झालेले नाही. सोहळ्याने येथे पहिला विसावा घेतला.

सोहळा काटेवाडीत सव्वाबारा वाजता पोचला. साडेबारा वाजता पालखी रथ पोचला. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेतली. त्यानंतर गावातील परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घातल्या, त्यावरून तुकोबांची पालखी गावात येत होती. त्यांच्या पुढे पारंपरिक काष्टासाडी नेसून डोईवर भगवा फेटा असलेल्या काटेवाडी प्राथमिक विद्यालयाच्या मुलींच्या लेझीम पथकाने जंगी स्वागत केले. त्यानंतर सोहळा मंदिरात दुपारच्या जेवणासाठी विसावला.

सोहळा तीन वाजता जेवण उरकून मुख्य रस्त्याला सव्वा तीन वाजता पोचला. गावातील नागरिकांनी पालखी खांद्यावरून पुन्हा मुख्य रस्त्यावर आणली. येथे पालखी रथात ठेवल्यानंतर धनगर समाजाच्या वतीने तुकोबांच्या पालखी रथाला मेंढ्यांची प्रदक्षिणा घालून रिंगण करून भक्तिभाव अर्पण केला. सोहळा बारामती तालुक्यात प्रवेश केल्यावर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पालखीचे स्वागत केले. रथाचे सारथ्य केले.

उद्या पहिले गोल रिंगण

सोहळा गुरुवारी सकाळी सात वाजता मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, सकाळी साडेआठच्या सुमारास बेलवडीत पहिले गोल रिंगण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT