ashadi wari 2023 wari Sant Tukaram maharaj Palkhi warkari reach at hadapsar  sakal
पुणे

Ashadi Wari 2023 : जगद्गुरु तुकोबाराय दुपारच्या विसाव्याला हडपसरला पोहचले, अमोल कोल्हेंचा पालखीला खांदा

कला संस्कृतीच्या ग्रुपने रांगोळ्यांचा पायघड्या अंथरल्या होत्या

राजेंद्रकृष्ण कापसे

हडपसर : जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी पहाटे पुण्यातून मार्गस्थ झाली. पुलगेट, भैरोबानाला, फातिमानगर, रामटेकडी, मगरपट्टा चौक मार्गे गाडीतळ परिसरात बारा वाजता हडपसर येथे दुपारच्या विसाव्यासाठी पोचली.

विसाव्या च्या ठिकाणी हडपसर ग्रामस्थ भजनी मंडळ सकाळी साडे नऊ पासून वाजल्यापासून भजन करीत होते. पंचपदी व त्यानंतर मानाच्या अभंगासह धन्य आजी दिन । झाले संताचे दर्शन ।। हा विशेष अभंग घेतला होता. विसाव्याचे ठिकाण फुलांनी सजविले होते.

कला संस्कृतीच्या ग्रुपने रांगोळ्यांचा पायघड्या अंथरल्या होत्या. भगव्या पताका लावल्या होत्या. पालखी येण्यापूर्वी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पाऊणे वाजता चौघडा आला. सव्वा बारा वाजता पोचला.

खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, व हडपसर ग्रामस्थांनी पालखी रथातून खांद्यावर घेतली. अन विसाव्याच्या चौथऱ्यावर ठेवली. स्थानिकाच्या दर्शनाची बारी सुरू झाली. खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे,

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख, माजी महापौर वैशाली बनकर, सुनील बनकर, माजी नगरसेवक उज्ज्वला जंगले, पालिकेचे अतिरिक्त रवींद्र बिनवडे, पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख, उपायुक्त संदीप कदम, सहायक आयुक्त प्रसाद काटकर, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे अजित लकडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT