स्व. अशोकराव तुपे पत्रकारिता पुरस्कारांचे आज वितरण
लोकहक्क फाउंडेशनतर्फे दोन वर्षांचे पुरस्कार; दुष्काळी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सहविचार सभा
सकाळ वृत्तसेवा
श्रीरामपूर, ता. २३ ः लोकहक्क फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. अशोकराव तुपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पत्रकारिता पुरस्कारांचे शनिवारी (ता. २४) सराला येथील लोकहक्क भवन, चैतन्य फार्म येथे वितरण होणार आहे.
दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार मंगल खिवंसरा असतील. ज्येष्ठ माध्यम सल्लागार व साहित्यिक राम दोतोंडे आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रल्हाद कचरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. दैनिक सकाळचे सहसंपादक प्रकाश पाटील आणि न्यूज १८ मराठीचे पत्रकार हरीश दिमोटे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष, माजी आमदार लहू कानडे यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व लोकहक्क फाउंडेशनच्या वतीने सकाळी ११ वाजता विधानसभा मतदारसंघातील बूथस्तरीय प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची सहविचार सभाही होणार आहे. मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यामुळे शेतकरी, कष्टकरी व लहान व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर सभेत चर्चा होईल, तसेच या घटकांना मदत करण्यासाठी पक्ष संघटनेच्या माध्यमातून करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. सभेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कानडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.