ashtavinayak highway car and container accident three died during treatment Sakal
पुणे

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

शिक्रापूरमध्ये राहणाऱ्या तरुणाने नवी कार घेतली होती. ही कार घेऊन शिक्रापूरचे सात तरुण थेऊर येथे देवदर्शनासाठी गेले होते.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : बकोरी - थेऊर या अष्टविनायक महामार्गावर जोगेश्वरी मंदिरासमोर कंटेनर व कारचा रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या चार प्रवाशांपैकी तीन जणांचा रविवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चौथ्या प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे.

शिक्रापूरमध्ये राहणाऱ्या तरुणाने नवी कार घेतली होती. ही कार घेऊन शिक्रापूरचे सात तरुण थेऊर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यातील तीन तरुण नवीन कारमध्ये होते. तर चार तरुण दुसऱ्या कारमध्ये होते. यातल्या दुसऱ्या कारचा रविवारी भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला होता. जखमी कारमध्येच अडकले होते.

अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सीमा ढाकणे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, वैद्यनाथ केदार, प्रदीप भुजबळ, विशाल गायकवाड या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. गणेश जाधव ( वय 32 ), विनोद भोजणे ( वय 36),  विठ्ठल जोगदंड (वय 36 ) या अशी मृतांची नावे आहेत. तिघेही शिक्रापूरचे रहिवासी आहेत.  

दरम्यान, दुसऱ्या अपघातात पुणे नगर महामार्गावर हॉटेल कावेरी समोर सळई घेवून थांबलेल्या ट्रक आणि कारचा अपघात झाला. यात कारचालक विजय अभिमन्यू तांदळे (वय 25, सध्या  रायसोनी कॉलेज रोड, वाघोली, मूळ रा. बीड ) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. रविवार सायंकाळी सात ते सोमवार पहाटे पाच वाजेपर्यंत 10 तासात चार जणांचा बळी गेला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

Nathsagar Dam : नाथसागराचे ड्रोनद्वारे चित्रिकरण पडले महागात; एका जणाविरुद्ध गुन्हा

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

SCROLL FOR NEXT