पुणे

आष्टी गटात चुरशीची तिहेरी लढत

CD

आष्टी जि.प. गट

डोंगरे, शेळके अन् सर्जे यांच्यात तिरंगी सामना
घरोघरी भेटी, कॉर्नर सभा- बैठकांवर प्रचारात भर

सकाळ वृत्तसेवा
आष्टी, ता. ४ : मोहोळ तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेली आष्टी जिल्हा परिषद गटातील तिहेरी लढत चुरशीची ठरणार आहे. पाच वर्ष सोलापूर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती राहिलेले व नुकताच भाजप सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले विजयराज डोंगरे यांच्या पुढे उद्योगपती भाजपचे समाधान शेळके व कॉंग्रेसचे राजेंद्र सर्जे यांचे आव्हान असणार आहे.

सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव असलेल्या आष्टी गटात एकूण १६,७५६ पुरुष तर १५,१४२ स्त्री मतदार असून आष्टी गणात ८१८५ पुरुष व ७५२६ स्त्री मतदार तर खंडळी गणात ८५७१ पुरुष आणि ७६१६ स्त्री मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
आष्टी गणासाठी लोकनेते कारखान्याचे संचालक मदनसिंह पाटील भाजपकडून तर आष्टीचे विद्यमान सरपंच डॉ. अमित व्यवहारे राष्ट्रवादीतर्फे तर बाबा गाडे कॉग्रेस, परमेश्वर पुजारी अपक्ष नशीब अजमावत आहेत. खंडाळी गणातून सतीश भोसले कमळ चिन्ह घेऊन तर गणेश मुळे घड्याळ तर दत्तात्रय कदम हात या चिन्हावर लढत आहेत.
या मतदारसंघावर आजपर्यत लोकशक्ती परिवाराचे मनोहर डोंगरे यांचे वर्चस्व राहिलेले आहे तर मोहोळचे माजी आमदार आष्टी गटात कमळ फुलविण्यासाठी ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्यक्ष गृहभेटी, घोंगडी बैठक, कॉर्नर सभा जाहीर सभा यामुळे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT