Deepak_Maratkar_Shivsena 
पुणे

कांबळेने मित्राच्या मदतीने केला मारटकर याचा खून; चौघांची पोलिस कोठडीत रवानगी

वृत्तसंस्था

पुणे : युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर याच्या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या अश्विनी कांबळे हिने तिच्या मित्राच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात तिचा मित्र प्रशांत कोलतेसह त्याचे साथीदार असलेल्या चौघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी सोमवारी (ता.५) चौघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

प्रशांत उर्फ सनी प्रकाश कोलते (वय २५, रा. राजेश सोसायटी, कात्रज), राहुल श्रीनिवास रागीर (वय २२, रा. ३४३ घोरपडे पेठ), रोहित ऊर्फ बाळा कमलाकर कांबळे (वय २२, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ), रोहित दत्तात्रेय क्षीरसागर (वय २१, रा.१०२, गंज पेठ) अशी कोठडी झालेल्यांची नावे आहेत. गुन्हा करताना वापरण्यात आलेली वाहने आरोपींकडून जप्त करण्यात आली आहेत. संबंधित गुन्हा हा नियोजनबद्ध केला असल्याने याबाबतचा कट कोठे केला, कसा केला त्यामागे सूत्रधार कोण याचा तपास करायचा असल्याने सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

शुक्रवारी (दि.२) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास बुधवार पेठेतील गवळी आळी समोरील रस्त्यावर घडलेल्या प्रकरणात तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांना मंगळवार (ता.६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी, राहुल भगवान आलमखाने (वय ४३, रा. बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा पोलिस शोध घेत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT