राज्यस्तरीयसाठी असिया बागवानची निवड
जिल्हास्तरावर गोळाफेकमध्ये तिसरी; कन्याशाळेत सत्कार
मलकापूर, ता. ४ : येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेच्या असिया बागवान हिने जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने म्हसवड येथे झालेल्या जिल्हास्तरीय सबज्युनियर स्पर्धेत १२ वर्षे मुलींच्या गटात गोळाफेक क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.
१२ वर्षे मुलींच्या वयोगटात गोळाफेक क्रीडा प्रकारात तिने ७.८० मीटर गोळाफेक करून स्पर्धेत वैयक्तिक चांगली कामगिरी केली. क्रीडाविभाग प्रमुख हसीनाबेगम मुल्ला यांचे तिला मार्गदर्शन तसेच क्रीडाशिक्षिका संगीता पाटील, सविता कोळी, योगेश खराडे, मल्हारी शिरतोडे यांचे सहकार्य मिळाले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात, संचालक वसंतराव चव्हाण, प्रा. संजय थोरात, मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका करुणा शिर्के, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनी तिचे अभिनंदन केले.
....
A01273
मलकापूर : असिया बागवान हिचा सत्कार करताना सुलोचना भिसे. त्या वेळी हसीनाबेगम मुल्ला, संगीता पाटील, सविता कोळी, योगेश खराडे, मल्हारी शिरतोडे.
.............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.